एक्स्प्लोर
Neeraj Chopra : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद...! नीरजचा 'रौप्यवेध'! जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
World Athletics Championships 2022: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्यानं रौप्यपदक जिंकलं आहे.

World Athletics Championships 2022
1/10

World Athletics Championships 2022: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.
2/10

जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे.
3/10

त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं.
4/10

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला.
5/10

तर नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकत पुन्हा वापसी केली.
6/10

नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला.
7/10

हाच त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष होतं.
8/10

काल 88.39 मीटर भाला फेकत भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला होता.
9/10

मात्र आज त्याची सुरुवात निराशाजनक झाली. फायनलमध्ये नीरजचा पहिला थ्रो फाऊल ठरला.
10/10

ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यानं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकला.
Published at : 24 Jul 2022 08:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
