एक्स्प्लोर
Lionel Messi Birthday : लिओनेल मेस्सी झाला 36 वर्षांचा, स्टार फुटबॉलपटूबाबतच्या काही खास गोष्टी; वाचा...
Lionel Messi Birthday : जगातील स्टार फुटबॉल लिओनल मेस्सी (Lionel Messi) याचा आज 36 वाढदिवस आहे. या स्टार फुटबॉलपटूबाबतच्या काही खास गोष्टी; वाचा...

Lionel Messi Birthday
1/11

मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी रोसारिओ अर्जेंटिना येथे झाला. लिओनेल अँड्रे मेस्सी (Lionel Andres Messi) हे त्याचं पूर्ण नाव आहे..
2/11

मेस्सीचे वडील एका स्टील कारख्यानात मजूर म्हणून काम करायचे.
3/11

मेस्सीला फुटबॉल खेळण्याची आवड त्याच्या आजीमुळे निर्माण झाली. आजीमुळे मेस्सी फुलबॉलकडे वळला.
4/11

आजीसोबत मेस्सीचं खूप जवळचं नातं होतं. पण तो फक्त 10 वर्षांचा असताना त्याच्या आजीचं निधन झालं.
5/11

मेस्सी 8 वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याने प्रसिद्ध रोसारियो फुटबॉल क्लबकडून खेळणं सुरु केलं.
6/11

मेस्सीची वाटचाल मात्र, सोपी नव्हती. तो अवघ्या 13 वर्षांचा असताना त्याला दुर्मिळ आजाराने ग्रासलं, यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या.
7/11

सर्व अडचणींवर मात करत मेस्सी मात्र, जिद्दीने खेळत राहिला. याचाच परिणाम आहे की, सध्या जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये मेस्सीचं नाव घेतलं जातं. आज मेस्सीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
8/11

कोपा अमेरिका फायनल मध्ये अर्जेंटिनाच्या पराभवानंतर 2016 साली मेस्सीने काही काळासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. पण, त्यानंतर त्याने हा निर्णय बदलला.
9/11

ऑगस्ट 2020 साली मेस्सीने एफसी बार्सिलोना क्लबची साथ सोडत फ्रान्समध्ये पॅरिस सेंट-जर्मन क्लबसोबत करार करत संपूर्ण जगाला मोठा झटका दिला.
10/11

30 जून 2023 साली मेस्सीचा पॅरिस सेंट-जर्मन क्लबसोबतचा दोन वर्षांचा करार संपला.
11/11

लिओनेल मेस्सी आता अमेरिकेतील इंटर मियामी क्लबशी जोडला जाणार आहे. यासाठी तो सध्या युरोप सोडून युएसएमध्ये (USA) दाखल झाला आहे.
Published at : 24 Jun 2023 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
