एक्स्प्लोर
SAFF Championship 2023 : भारताचा शानदार विजय! लेबनानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक
SAFF Championship 2023 : भारतीय फुटबॉल संघाने (Team India) शानदार विजयासह सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

SAFF Championship 2023 | Team India
1/11

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत लेबनॉनचा 4-2 असा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचं (Indian Football Team) दमदार प्रदर्शन पाहायला मिळालं.
2/11

भारत-लेबनॉन सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत खेळला गेला, पण अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला
3/11

सॅफ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत भारतीय फुटबॉल संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये लेबनॉनचा दमदार पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली.
4/11

निर्धारित 90 मिनिटांनंतर सामना 0-0 असा बरोबरीत संपल्यामुळे अतिरिक्त वेळेत खेळला गेला. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला.
5/11

आता भारतीय फुटबॉल संघाचा अंतिम सामना 4 जुलै रोजी कुवेत संघासोबत रंगणार आहे.
6/11

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची शानदार कामगिरी पाहायला मिळाली आहे.
7/11

भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेपाळचा पराभव केला होता.
8/11

त्यानंतर कुवेतविरुद्धचा शेवटचा गट सामन्याचा निकाल 1-1 असा बरोबरीत लागला.
9/11

यानंतर उपांत्य फेरीतही भारताने लेबनॉनचा पराभव करत विजयी कामगिरी कायम ठेवली आहे.
10/11

भारत तेराव्यांदा सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडिया आठ वेळा सॅफ चॅम्पियन ठरला आहे. तर, चार वेळा उपविजेता ठरला आहे.
11/11

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नजर नवव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे असेल.
Published at : 02 Jul 2023 09:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
