एक्स्प्लोर
शिर्डीच्या साईं संस्थानला आठ दिवसांत कोट्यवधींचं दान, आठ लाख भाविकांनी घेतलं दर्शन
25 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत 8 कोटी 78 लाख 79 हजार रूपये जमा झाले आहेत.

Sai baba
1/10

शिर्डीच्या साईबाबांना (Sai baba) एका आठवड्यात कोट्यवधी रूपयांचं दान जमा झालंय.
2/10

ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि त्यानंतर नविन वर्षानिमित्त भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. त्यामुळे 25 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या काळात साईबाबांना तब्बल 17 कोटी 81 लाख रूपयांचं दान जमा झाले आहे.
3/10

25 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात दानपेटीत 8 कोटी 78 लाख 79 हजार, देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 67 लाख 67 हजार 698 रुपये, डेबीट आणि क्रेडीट कार्डद्वारे 2 कोटी 15 लाख 18 हजार रूपये, ऑनलाइन देणगी 1 कोटी 21 लाख रूपये, मनिऑर्डरद्वारे 32 लाख रूपये, ९० लाख 31 हजार रुपयांचे 1 किलो 849 ग्राम सोने आणि 6 लाख रुपयांच्या 16 किलो चांदी जमा झाली आहे.
4/10

25 डिसेंबर रोजी ख्रिसम आणि त्यानंतर नवीन वर्षानिमित्त भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.
5/10

आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.
6/10

5 लाख 70 हजार 280 भक्तांनी मोफत भोजनाचा लाभ लाभ घेतला.
7/10

25 डिसेंबरपासून 2 जानेवारी या कालावधीत सशुल्क आरती आणि दर्शनपासद्वारे साई संस्थानला 4 कोटी 5 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
8/10

लाडू विक्रीद्वारे 1 कोटी 32 लाख रूपये आणि निवास व्यवस्थेतून संस्थानला 1 कोटी 44 लाख रूपयांचं उत्पन्न मिळालं आहे.
9/10

आठ दिवसांच्या कालावधीत 171 रक्तदात्यांनी या काळात रक्तदान केलंय.
10/10

संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आज गेल्या आठ दिवसांतील रक्कम मोजली
Published at : 03 Jan 2023 10:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
