एक्स्प्लोर
Opposition Party Meet : बंगळूरमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीचं सत्र, 'हे' नेते झाले बैठकीमध्ये सहभागी
Opposition Party Meet : बंगळूरमध्ये विरोधी पक्षाच्या बैठकीचा सोमवार (17 जुलै) हा पहिला दिवस होता.

Opposition Party Meet
1/9

या बैठकीमध्ये एकूण 26 पक्षांनी सहभाग नोंदवला आहे.
2/9

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर मोठ्या नेत्यांनी या बैठकीमध्ये हजेरी लावली.
3/9

या दोन दिवसीय बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात रणनिती आखण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
4/9

या बैठकीची सुरुवात आम्ही एक आहोत हा संदेश देऊन करण्यात आली आहे.
5/9

मल्लिकार्जुन खर्गे, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, लालू यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी बंगळुरूमध्ये विरोधकांच्या डिनर डिप्लोमॅसीला हजेरी लावली. दुसरीकडे, शरद पवार मंगळावार (18 जुलै) बेंगळुरूमध्ये विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
6/9

याशिवाय डीएमकेचे नेते आणि तसेच द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील हजेरी लावली.
7/9

तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि इतर अनेक नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते.
8/9

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील हजेरी लावली. विरोधी पक्षांना एकत्र करण्यात या दोघेही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत.
9/9

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट भारताच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे.
Published at : 17 Jul 2023 11:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
