एक्स्प्लोर
International Womens Day 2022 : 'ही' महिला पात्रं नायकांवर पडली भारी, या महिला दिनी 'हे' चित्रपट जरूर पहा

International Womens Day 2022
1/5

कहानी - कहानी या चित्रपटात तुम्हाला विद्या बालनची गोष्ट आठवत असेलच, या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव होते विद्या बाग. विद्याने ही व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारली की ती चाहत्यांची आवडती अभिनेत्री झाली. विद्या बालनबद्दल बोलताना आवर्जून या चित्रपटाचा उल्लेख केला जातो.
2/5

क्वीन - खरंतर कंगना रणौतला पंगा क्विन म्हटले जाते. कंगना रणौतचे बहुतेक चित्रपट हे महिला केंद्रित आहेत. क्विन या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावदेखील होता. परंतु, कंगनाच्या व्यक्तिरेखेने सगळ्यांचे लक्ष वेधले.
3/5

तनू वेड्स मनू - या चित्रपटात तनू होती आणि मनूही. पण तनू मनूवर भारी पडली. लोकांना चित्रपट खूप आवडला तर तनूची मस्त, निर्दोष शैलीही. या चित्रपटात आर माधवनसारखा अभिनेता होता, पण आजही या चित्रपटाचे नाव घेतले तर कंगना राणौतची आठवण येते.
4/5

इंग्लिश विंग्लिश - इंग्लिश विंग्लिशमध्ये श्रीदेवीने एका गृहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील प्रमुख पात्रला इंग्रजी येत नाही आणि त्यामुळेच तिची मुले आणि पती तिचा आदर करत नाहीत. पण अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या व्यक्तिरेखेने अशी छाप सोडली की शशीचे हे पात्र घराघरांत नावारूपास आले. या चित्रपटातील पात्राला बहुतेक महिलांनी स्वत:शी कनेक्ट केले.
5/5

हायवे - या चित्रपटात रणदीप हुडा आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट एका अतिशय अनोख्या विषयावर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. आजही या चित्रपटातील आलिया भट्टचा रोल सर्वात शक्तिशाली आणि लक्षात राहण्याजोगा आहे.
Published at : 07 Mar 2022 07:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion