एक्स्प्लोर
Diwali 2024 Fashion: दिवाळीत गरोदर महिलांचीही नटण्याची खास तयारी! 'या' अभिनेत्रींकडून घ्या टिप्स, दिसाल परफेक्ट
Diwali 2024 Fashion: गरोदर महिलांना सर्वात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे सणासुदीत तयारी कशी करावी? गरोदर अवस्थेत आरामदायी आणि सुंदर लूक कसा असावा? यासाठी आम्ही तुम्हाला काही अभिनेत्रींचे लूक दाखवणार आहोत.
Diwali 2024 Fashion lifestyle marathi news Pregnant women also prepare to dance in Diwali Get tips from these actresses
1/7

आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली आहे. या सणाचा उत्साह काही महिन्यांपूर्वीच दिसून येतो. दिवाळीला आपण छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र गरोदर महिलांना सणासुदीच्या काळात भरजरी कपडे घालणे खूप कठीण जाते. अशावेळी तिचा लूक सुंदर दिसावा, तसेच कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दिवाळीला काय नेमकं काय परिधान करावं याची काळजी असते. आज आम्ही तुम्हाला काही अभिनेत्रींचे लूक दाखवणार आहोत, ज्यांनी गरोदरपणातही आपली सुंदर स्टाईल कॅरी दाखवली आहे. त्यांच्याकडून टिप्स घेऊन तुम्ही दिवाळी पूजेसाठी तयार होऊ शकता.
2/7

दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक - जर तुम्हाला काही हेवी परिधान करायचं नाहीय, तर अशी बॉर्डर असलेली साडी निवडा. अशी साडी तुम्हाला दिवाळीच्या पूजेमध्ये सुंदर दिसण्यास मदत करेल. अशा साडीसोबत केसांमध्ये अंबाडा बनवा, जेणेकरून उघड्या केसांचा त्रास होणार नाही.
3/7

दीपिका पदुकोणचा दुसरा लूक - जर तुम्हाला साडी नेसणे आवडत नसेल तर अशा प्रकारचा अनारकली सूट घाला. अनारकली सूट खूप आरामदायक आहे. गरोदर अवस्थे साडी कॅरी करताना त्रास होऊ शकतो, पण अनारकली सूटमध्ये तुम्हाला अशी कोणतीही समस्या येणार नाही.
4/7

देवोलीना भट्टाचार्जीचा फर्स्ट लुक - तुमच्याकडे सिल्क फॅब्रिकचा लेहेंगा असेल तर दिवाळी पूजेसाठी यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. सिल्क फॅब्रिक लेहेंगा खूप हलका आहे. अशा वेळी तुम्ही दिवाळीच्या पूजेतही ते कॅरी करू शकता. अशा लेहेंगासह, केसांचा अंबाडा बांधून गजरा लावा.
5/7

देवोलीना भट्टाचार्जीचा दुसरा लूक - जर तुम्हाला काही हलके कपडे घालायचे असतील तर असा गुलाबी सूट तुम्हाला सुंदर लुक देईल. या प्रकारचा सूट सुंदर दिसतो. त्याचा रंगही खूप सुंदर आहे, जो पूजेच्या वेळी सुंदर दिसेल.
6/7

रुबिना दिलाकचा फर्स्ट लूक - जर तुमच्याकडे या प्रकारचा शरारा सूट असेल तर तो पूजेदरम्यान घाला. हा साधा सूट तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्टाइलने आणखी सुंदर बनवू शकता. जर तुम्हाला वेगळी हेअरस्टाईल करायची असेल तर केसांना सॉफ्ट कर्ल करा.
7/7

रुबिना दिलीकचा दुसरा लूक - जर तुम्हाला गरोदरपणात आरामदायी लूक हवा असेल तर असा चिकनकारी कुर्ता घाला. त्यासोबत पलाझो किंवा शरारा घाला, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. चिकनकारी कुर्ता खूप हलका आहे, त्यामुळे तुम्हाला तो परिधान करणे आरामदायक होईल.
Published at : 28 Oct 2024 11:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























