एक्स्प्लोर
Smoking : आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास धूम्रपानाच्या व्यसनापासून सुटका होऊ शकते !
आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींच्या सेवनाबद्दल सांगणार आहोत ज्याचा आहारात समावेश केल्यास तुम्ही या व्यसनापासून बऱ्याच अंशी मुक्त होऊ शकता !

धूम्रपान केल्याने तुमच्या शरीरात अनेक आजार होऊ शकतात. दरवर्षी 13 मार्च रोजी नो स्मोकिंग डे साजरा केला जातो. अशापरिस्थितीत तुम्हालाही बिडी-सिगारेटपासून सुटका करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींच्या सेवनाबद्दल सांगणार आहोत ज्याचा आहारात समावेश केल्यास तुम्ही या व्यसनापासून बऱ्याच अंशी मुक्त होऊ शकता.(Photo Credit : pexels )
1/7

धूम्रपानामुळे आरोग्याला होणाऱ्या हानीबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी देशात आणि जगभरात दरवर्षी 13 मार्च रोजी 'नो स्मोकिंग डे' साजरा केला जातो. धूम्रपानाच्या वाईट व्यसनातून लोकांची सुटका व्हावी हा यामागचा उद्देश आहे. हे घाणेरडे व्यसन आपल्यासाठी किती घातक आहे हे जर आता तुम्हालाही कळले असेल आणि तुम्ही ते सोडण्याचे ठरवले असेल तर तुम्ही येथे नमूद केलेल्या काही गोष्टींना आपल्या आहाराचा भाग बनवू शकता. या सवयीपासून बऱ्याच अंशी सुटका होण्यासाठी हे उपयुक्त ठरतील. चला जाणून घेऊया त्याबद्दल.(Photo Credit : pexels )
2/7

दूध पिल्याने सिगारेटची चव कडू होते आणि त्याची चव खराब होते, असे अनेकांचे मत आहे. अशावेळी या व्यसनावर मात करण्यासाठी तुम्ही दुधाचे सेवन करू शकता. याशिवाय दुधापासून बनवलेल्या सर्व दुग्धजन्य पदार्थांचा ही तुम्ही आपल्या आहारात समावेश करू शकता.(Photo Credit : pexels )
3/7

धुम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठीही लिकोरिसचे सेवन खूप प्रभावी आहे. यात असे गुणधर्म आहेत जे आपल्याला तणाव आणि थकव्यापासून दूर ठेवतात. बिडी सिगारेटची सवय कमी करण्यासाठी तुम्ही लिकोरिसचा एक छोटासा तुकडा तोंडात ठेऊ शकता.(Photo Credit : pexels )
4/7

तुम्हालाही अधूनमधून बीडी-सिगारेटची ओढ येत असेल तर दालचिनीचे तुकडे खिशात ठेवण्याची सवय लावा. यामध्ये असलेले सोडियम, थायमिन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक आपल्याला ऊर्जा देतील, तसेच चवीला थोडे तिखट आणि कडू असल्याने धूम्रपानाची सवय कमी होऊ शकते.(Photo Credit : pexels )
5/7

तुम्हाला हे विचित्र वाटेल, पण काही अभ्यासांमध्ये असेही दिसून आले आहे की पॉपकॉर्न खाल्ल्याने सिगारेटच्या व्यसनात मोठा आराम मिळतो. कारण त्यांना नीट चावून खावे लागते, अशा वेळी तुमचे तोंड व्यस्त राहते, तसेच त्यात असलेले फायबर तुमचे पोट बराच वेळ भरलेले ठेवते आणि धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते.(Photo Credit : pexels )
6/7

काळी मिरीच्या सेवनाने धूम्रपान करण्याची इच्छा ही कमी होते. यामुळे आरोग्याला फायदा तर होतोच, पण त्यापासून बनवलेल्या आवश्यक तेलाचा वास घेऊन तुम्ही बिडी-सिगारेटची इच्छा ही कमी करू शकता.(Photo Credit : pexels )
7/7

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 12 Mar 2024 03:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
