राजपथ आणि दिल्लीच्या इतर सीमांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिवस आणि शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड लक्षात घेत राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
2/8
सरकार आणि 41 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये 11व्या दौऱ्याची बैठकही निष्फळ ठरली होती. दहाव्या दौऱ्याच्या बैठकीत शेतकऱ्यांसमोर केंद्र सरकारने कृषी कायद्यांना एक ते दीड वर्ष स्थगिती देण्यास तयार असल्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावला.
3/8
दरम्यान, शेतकरी नेत्यांनी आज सकाळी 10 वाजता नऊ ठिकाणी ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली आहे. ढांसा, चिल्ला, शाहजहांपूर , मसानी बराज, पलवल आणि सुनेढा बॉर्डरवरही ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली आहे.
4/8
वाढत्या थंडीतही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. दररोज शेतकरी रस्त्यांवर बसून कायदे मागे घेण्यासाठी घोषणा देत आहेत.
5/8
जवळपास गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारनं लागू केलेले तीनही नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. तर केंद्र सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांशी चर्चा करुन आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
6/8
मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन कृषी कायद्यांच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
7/8
टिकरी बॉर्डरवर विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलीस बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
8/8
कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेड सुरु करण्यात येणार आहे.