एक्स्प्लोर
Koffee with Karan : कॉफी विथ करण शो बंद होणार?

(photo:karanjohar/ig)
1/6

Koffee with Karan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता असणारा करण जोहर (Karan Johar) त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. 'कॉफी विथ करण' (Koffee with Karan) या करणच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते.(photo:karanjohar/ig)
2/6

या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगतात. आमिर खान (Aamir Khan) , शाहरूख खान (Shah Rukh Khan) , अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सलमान खान (Salman Khan) यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली होता.(photo:karanjohar/ig)
3/6

आता या कार्यक्रमाबद्दल करणनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.(photo:karanjohar/ig)
4/6

करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सहा सीझननं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार नाही.(photo:karanjohar/ig)
5/6

करणनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. करणनं पोस्टमध्ये लिहिलं, 'हॅलो, कॉफी विथ करण हा शो मझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होता. मला वाटतं की आम्ही पॉप संस्कृतीमध्ये प्रभाव पाडला. मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की कॉफी विथ करण हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षरकांच्या भेटीस येणार नाही. ' या पोस्टला करणनं 'महत्वाची घोषणा' असं कॅप्शन दिलं.(photo:karanjohar/ig)
6/6

करणच्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच काही सेलिब्रिटींनी देखील या पोस्टला कमेंट केली. प्राजक्ता कोळी म्हणजेच मोस्टली सेन तसेच राजाकुमारी यांनी या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत.(photo:karanjohar/ig)
Published at : 04 May 2022 04:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
नागपूर
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
