एक्स्प्लोर

‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?

नुकताच 'सालबर्डी' या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

Marathi Movie Puja Sawant: मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं  तिच्या व्यक्तिरेखेचं  नाव आहे. नुकताच 'सालबर्डी' या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

या सोहळ्यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली,अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण केले.

आपल्या भूमिकेविषयी पूजा म्हणाली...

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, ‘वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.’ चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अ‍ॅक्शन सीन्स हे 'सालबर्डी' चे खास आकर्षण असणार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. 

स्टारकास्ट काय?

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...
'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...
Amol Kolhe: लिखाणाचे पैसे घेत नाही, अभिनयाचेही पैसे सोडतोय; 'मी सावित्रीबाई.. ' मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हेंची धडपड; पेमेंटचा एक रुपयाही ..; VIDEO व्हायरल
लिखाणाचे पैसे घेत नाही, अभिनयाचेही पैसे सोडतोय; 'मी सावित्रीबाई.. ' मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हेंची धडपड; पेमेंटचा एक रुपयाही ..; VIDEO व्हायरल
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget