एक्स्प्लोर

सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता

Mi Savitribai Jyotirao Phule on Star Pravah new chapter begins: मालिकेत आता सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा टप्पा दाखवला जाणार आहे.

Mi Savitribai Jyotirao Phule serial new leap cast details: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.  महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग  ही मालिका आवर्जून पाहत आहे.  या मालिकेतून सावित्रीबाई आणि जोतीरावांचा खडतर प्रवास दाखवण्यात येत आहे. बालपण ते समाजसुधारकपर्यंतचा प्रवास, त्यांनी अनेक विरोधांचा सामना करत समाज घडवला. बालपण, सावित्रीमाई आणि जोतीराव यांचा  विवाहसोहळा, फुलेवाड्यात घडलेले प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न, यासह जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठी धडपड हे सारं काही या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. थोर व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले आणि जोतीराव यांचा खडतर प्रवास सोपा नव्हता.  त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे.  

अशातच ही मालिका आता नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे.   लवकरच या खास मालिकेतून सावित्रीबाई आणि जोतीराव यांचं तरुणपण कसं होतं?  तारुण्यावस्थेतील नवा अध्या अनुभवायला मिळणार आहे. मालिकेच्या या नवीन टप्प्यात समाजात असणारी रुढी आणि परंपरेची आव्हाने, सावित्रीबाईंचं शिक्षण,  त्यांचं स्वावलंबी होणं, जोतीरावांची यासाठी होणारी धडपड, हे सगळं या मालिकेतून प्रेक्षकवर्गाला पाहायला मिळणार आहे. 

विरोध असताना जोतीरावांनी समाजाची चौकट मोडण्याचं दाखवलेलं धैर्य हे खरंच वाखणण्याजोगं आहे, आणि हीच माहिती या मालिकेतून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे.  नव्या पिढीला यातून बरंच काही शिकता येईल, मालिकेतलं हे पर्व नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही. 

मालिकेच्या या नव्या टप्प्यात अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. अभिषेक देशमुखला खरी ओळख आई कुठे काय करते या मालिकेतून मिळाली होती. तर, सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री  राजसी भावे साकारणार आहे. या भूमिकेविषयी माहिती देताना अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या आयुष्यातली ही पहिली मालिका.  पहिली मालिका तेही स्टार प्रवाहसोबत.. महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाईंची भूमिका साकारायला मिळणं, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी..  तक्षा शेट्टीनं  या मालिकेत सावित्रीबाईंच्या बालपणीची भूमिका साकारली होती.  तिनं ही भूमिका वेगळ्या उंचीवर  नेऊन ठेवली.   तिच्याकडून भरपूर गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.  थोड्या काळासाठी का होईना, ही भूमिका साकारायला मिळणं, माझ्यासाठी पर्वणीच..', असं अभिनेत्रीनं म्हटलंय.

तर, जोतीरावांची भूमिका साकारणारा अभिषेक देशमुख म्हणाला, 'इतक्या महान व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळत आहे, ही मा‍झ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे.  ही मालिका मला प्रचंड आवडते. पहिल्या एपिसोडपासून ही मालिका मी न चुकता पाहतो.  या मालिकेची कथा अभ्यासपू्र्वक लिहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा या मालिकेसाठी मला विचारणा झाली, तेव्हा मला फार अभ्यास करावा लागला नाही.   मालिका मी पाहत होतो. या कथेतूनच माझा सराव झाला होता.  आई कुठे काय करते, या मालिकेनंतर मी पुन्हा स्टार प्रवाह परिवारात  सामील होतो आहे.   माझ्यासाठी खरंच दुग्धशर्करा योग आहे', असं अभिषेक म्हणाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
Embed widget