एक्स्प्लोर
Happy Birthday Ameesha Patel: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अमीषा पटेलबद्दलच्या 'या' खास गोष्टी!

(photo:ameeshapatel9/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) आज (9 जून) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 जून 1976 रोजी मुंबईत गुजराती कुटुंबात जन्मलेल्या अमीषाने 2000मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(photo:ameeshapatel9/ig)
2/6

हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. 2001मध्ये आलेला तिचा 'गदर' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. अमीषा पटेलने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत 40हून अधिक चित्रपट केले आहेत. मात्र, तिच्या कारकिर्दीचा आलेख सतत घसरत राहिला.(photo:ameeshapatel9/ig)
3/6

अमीषाला या 'कहो ना प्यार है' चित्रपटात तिच्या वडिलांमुळे भूमिका मिळाली होती. या चित्रपटाच्या यशानंतर 2001 साली आलेल्या 'गदर' चित्रपटातून खऱ्या अर्थाने तिला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात सनी देओलसोबत अमीषाने उत्तम काम केले होते. या चित्रपटासाठी अमीषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.(photo:ameeshapatel9/ig)
4/6

2002 मध्ये अमिषाने बॉबी देओलसोबत 'हमराज' चित्रपटात काम केले होते. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. तीन वर्षात सलग तीन हिट चित्रपट देऊनही अमीषाचे करिअर मात्र उतरणीला लागले.(photo:ameeshapatel9/ig)
5/6

अमीषाने 2005 मध्ये आमिर खानसोबत 'मंगल पांडे' चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही. 2007मध्ये, अमिषाने 'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' मध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट हिट ठरला होता. यानंतर अमीषाने ‘भूलभुलैया’ आणि ‘रेस 2’सारख्या हिट चित्रपटात काम केले. पण, साईड रोलमुळे अमीषाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. ती शेवटची ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय ‘बिग बॉस’च्या 13व्या सीझनमध्ये ती दिसली होती.(photo:ameeshapatel9/ig)
6/6

जेव्हा हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते, तेव्हा अमिषाने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मात्र, तिथेही तिला अपेक्षित यश मिळाले नाही. अमीषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिचा आणि तिच्या वडिलांचा वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्रीचे आई आणि वडिलांसोबत अजिबात जमत नाही. त्यांच्यामध्ये मालमत्तेवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अमीषाने तिच्या वडिलांवर 12 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला होता.(photo:ameeshapatel9/ig)
Published at : 09 Jun 2022 11:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
