एक्स्प्लोर

शूट लांबलं अन् प्रेमात पडली...सोनाली खरेचा नवरा खरोखरच तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठा? अभिनेत्रीने सगळंच सांगून टाकलं..

सोनालीचा नवरा पंजाबी आहे. अनेकदा अशी चर्चा होते की सोनाली आणि तिचा नवरा बिजय आनंद या दोघांच्या वयात तब्बल 27 वर्षांचा अंतर आहे.

Sonali Khare: मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती आता स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नशीबवान' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनालीच्या कामाबद्दल जशी चर्चा होते तशीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती कायम चर्चेत असते. सोनालीचा नवरा पंजाबी आहे. अनेकदा अशी चर्चा होते की सोनाली आणि तिचा नवरा बिजय आनंद या दोघांच्या वयात तब्बल 27 वर्षांचा अंतर आहे. काही वर्षांपूर्वी अशा चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या होत्या. पण अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली खरेने या सगळ्या पोस्ट चुकीच्या असल्याचे सांगत तिचं आणि बिजयच्या वयातील खरंतर सांगितलं आहे. दोघांच्या लव स्टोरीबद्दलही ती बोलली आहे. (Sonali Khare Bijay Anand)

शूटिंग दरम्यान भेट, 15 दिवसांत ..

कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने तिच्या आणि बिजयच्या वयासह त्या दोघांच्या नात्यावरही सांगितलंय. ती म्हणाली " खरंतर मी माझ्या नवऱ्याला भेटले एका शूटिंगमुळेच. त्याने एक्टिंग सोडली होती.नंतर त्याने बरेच मॉडेलिंगचे प्रोजेक्ट केले होते. काही सिरीयल केल्या होत्या. तो त्याच्या बिझनेसमध्येच अधिक रमला. अरे माझं माझं एकीकडे चाललेलेच होतं. आपण म्हणतो ना की कोणीतरी जेव्हा भेटणार हे लिहिलेलं असतं तेव्हा ते भेटतातच. तसंच आमचंही झालं. विजयच्या एका मित्राने त्याला विचारलं होतं की ,' एक शूट आहे. छोटी स्टोरी आहे. तू काम करशील का?' त्यावर बिजय 'नाही आता मी काम करत नाही. मी काम सोडलं' असं म्हणालेला. त्याच्या मित्राने टाईमपास म्हणून कर असं म्हणल्यानंतर तो तयार झाला. तेव्हा माझं एक शूट कॅन्सल झालं होतं . आणि मला रात्री फोन आला की 'आमच्या प्रोजेक्ट मधील मुख्य काम करणारी अभिनेत्री सध्या काम करू शकत नाही तर तू करशील का ?'  मी हो म्हणाले आणि गेले. 

लग्न कर किंवा ब्रेकप कर, सोनालीने ठरवलं...

"जून जुलै मधला पाऊस होता. खूप पाऊस पडत होता. माझ्या आई माझ्यासोबत होती. मी टाईप करत मढला पोहोचलो. आधी तो फार गर्व करणारा वाटला होता. पण नंतर आमच्या चांगली मैत्री झाली. नंतर मला कळालं की तो खूप फन आणि प्रेमळ आहे. पण त्याच्या एकूण पर्सनॅलिटी वरून तो खडूस वाटायचा. आम्ही भेटायला लागलो. चार दिवसाचा सूट पावसामुळे पंधरा दिवस लांबलं. आम्ही भेटत राहिलो. अडीच वर्ष मी त्याला भेटत होते. माझी आई शेवटी म्हणाली की एक तर लग्न कर किंवा ब्रेकअप कर. आम्ही एकमेकांबद्दल खूप सिरीयस होतो. त्याने मला प्रपोज केलं. आणि आम्ही लग्न केलं. " असं सोनाली म्हणाली.

सोनालीचा नवरा खरोखरच 27 वर्षांनी मोठा?

" आम्ही सगळा विचार करून निर्णय घेतला होता. तो पंजाबी मी मराठी. आमच्यात आठ वर्षांचं अंतर . काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर मला अनेक लोकांनी छळलं होतं. सोनाली खरे आणि बिजय यांच्यात 27 वर्षांचा अंतर वगैरे. माझं असं झालं होतं की माझा जन्मही झाला नव्हता म्हणजे! जरा तरी विचार करा. एकाने टाकल्यानंतर सगळ्यांनीच पोस्ट केल्या. त्यामुळे मला अजून एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे हे सांगायला की आमच्यात आठ वर्षांचं अंतर आहे . " असं सोनाली म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget