एक्स्प्लोर
बिग बॉसच्या घरात प्रेमाचा ट्रिगर, अरबाझ होणार का निक्कीचा जिगर?
स्प्लिट्सविला हा रिअॅलिटी शो गाजवलेल्या अरबाजची सध्या चांगलीच चर्चा आहे. तो बिग बॉस मराठीच्या यावेळाच्या पर्वाचा स्पर्धक असून त्याची जिंकण्याची रणनीती काय आहे, असे विचारले जात आहे.

हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या निक्की तांबोळीसह अनेक मुलींना अरबाजने आपल्या लूकने घायाळ केलं आहे.
1/10

रिअॅलिटी शोचा स्टार आणि स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन गाजवायला सज्ज आहे.
2/10

अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा जिगरबाज तरुण आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे.
3/10

हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या निक्की तांबोळीसह अनेक मुलींना अरबाजने आपल्या लूकने घायाळ केलं आहे. पण अरबाजची जिंकण्याची एक खास रणनीती आहे.
4/10

'बिग बॉस मराठी'बद्दल बोलताना अरबाज पटेल म्हणाला,"आपल्या मराठी 'बिग बॉस'मध्ये मी सहभागी झालो आहे. आता राडा होणार... तंटा नाय तर घंटा नाय तर चला करुया राडा.. मला 'बिग बॉस मराठी'मध्ये पाहण्याचं माझ्या आईचं स्वप्न होतं.
5/10

. 'बिग बॉस'मध्ये मोठी स्पर्धा असते. मुळात जिथे स्पर्धा तिथे अरबाज पटेल पण आलाच. स्प्लिट्सविलामध्ये मी खूप राडा केला होता. आता 'बिग बॉस मराठी'मध्येही मी राडा करताना दिसून येणार आहे".
6/10

फोन आणि सोशल मीडियाच्या न वापराबद्दल अरबाज पटेल म्हणतो,"स्प्लिट्सविलामध्ये असताना 95 दिवस मी फोन आणि सोशल मीडियापासून दूर होतो. आता इथे पण मी फोन, सोशल मीडियापासून दूरच असणार आहे.
7/10

'बिग बॉस'मध्ये जाण्याचं मी ठरवलं तेव्हा माझ्या आईला अश्रू अनावर झाले होते. आता मला 'बिग बॉस'मध्ये पाहतानाही आईला रडू येत असेल. . मी घरात जाण्याआधी शेवटचा फोनदेखील आईला केला होता. आता आई आणि माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्या घरातला मी कर्ता मुलगा आहे. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातही माझंच अधिराज्य असणार".
8/10

जिंकण्याच्या रणनीतीवर भाष्य करताना अरबाज म्हणतो, घरातला मी कर्ता मुलगा असल्याने मला माहिती आहे की काय केल्यावर मी कॅप्टन बनेल.
9/10

माझ्या अंडर एक टीम असणार ही बाब मला खूप आवडते.
10/10

प्रेक्षकांचं मला वेड्यासारखं प्रेम आणि सपोर्ट हवाय.
Published at : 31 Jul 2024 02:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
