एक्स्प्लोर
केवळ 20 रुपयात दोन लाखांपर्यंतचा विमा;पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेबाबत तुम्हाला माहितीय?
PM Suraksha Bima Yojana: भारत सरकारनं 2015 मध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली. ही एक अपघात विमा पॉलिसी आहे. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा केवळ 20 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

PM Suraksha Bima Yojana
1/9

आपलं आयुष्य धकाधकीचं आणि अनिश्चिततेनं भरलेले आहे. केव्हा आणि कोणासोबत काय घटना घडेल, हे इथे काहीही सांगता येत नाही.
2/9

अशा अनपेक्षित घटनांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी लोक विमा पॉलिसी घेतात. परंतु जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी सर्व लोकांकडे पुरेसे पैसे नसतात.
3/9

अशा परिस्थितीत केंद्र सरकारमार्फत एक विशेष योजना राबवली जात आहे. ही विशेष योजना अशा लोकांसाठी उपयुक्त ठरते.
4/9

भारत सरकारनं 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली. ही एक अपघात विमा पॉलिसी आहे. या पॉलिसीद्वारे अपघातात मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास तुम्ही सरकारकडे क्लेम करू शकता.
5/9

18 ते 70 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. योजनेअंतर्गत दरवर्षी 20 रुपये प्रीमियम भरावा लागतो. जे तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट होतात.
6/9

योजनेंतर्गत दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर किंवा पूर्णतः विकलांग झाल्यानंतर दोन लाखांपर्यंतच्या क्लेम मिळतो. तर, दुर्घटनेत काही प्रमाणात विकलांग झाल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मिळतो.
7/9

योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, योजनेची अधिकृत वेबसाईट https://www.jansuraksha.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
8/9

इथे तुम्हाला स्कीम फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
9/9

यानंतर तुम्हाला तुमची योग्य माहिती त्यात टाकावी लागेल. तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संबंधित कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करावा लागेल.
Published at : 29 Sep 2024 10:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
कोल्हापूर
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
