एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2024 : आले हो गणपती आले! सांगलीतील चोर गणपतीचं चोरपावलांनी आगमन; गणेश चतुर्थीच्या 4 दिवसांआधीच बाप्पाची प्रतिष्ठापना, दीडशे वर्षांची परंपरा
Ganeshotsav 2024 : सांगलीच्या चोरगणपतीची दीडशे वर्ष जुनी परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते, यानुसार आज सांगलीच्या गणपती मंदिरात चोर गणपती विराजमान झालेत.

Sangli Chor Ganpati 2024 Arrives
1/13

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या 'चोर' गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना झाली.
2/13

पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिपदेला, म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते.
3/13

चतुर्थीच्या चार दिवस आधीच या बाप्पाचं आगमन होतं.
4/13

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला 150 वर्षांची परंपरा आहे.
5/13

चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे.
6/13

चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भक्त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला "चोर गणपती" म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.
7/13

यंदा मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे, मंदिराबाहेर कारंजे लावून तिरुपती मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
8/13

मुख्य प्रवेशद्वारावर देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
9/13

गणेशचतुर्थीच्या आधी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते.
10/13

मंदिरात एकाच वेळी साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते.
11/13

गणपती मंदिरात गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशा दोन मूर्ती बसवण्यात येतात.
12/13

चोरगणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली असते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती, तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तींची स्थापना केली जाते.
13/13

गणेशोत्सवानंतर या मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात. या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही, तर जतन केलं जातं. या मूर्तीला सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं.
Published at : 04 Sep 2024 11:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
बातम्या
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
