एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case: चितर, पाखरं, ससे...विष्णू चाटे सुदर्शन घुलेवर भडकला; संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला!

Santosh Deshmukh Murder Case Updates: संतोष देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींनी केला होता.

Santosh Deshmukh Murder Case Updates: बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींनी केला होता, असं धनंजय देशमुख गेल्या काही दिवसांपासून सांगत होते. आता याबाबतचा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय आहे. संतोष देशमुखांना  खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन आरोपींना आखला होता अशी गोपीनीय साक्षीदाराने साक्ष दिली आहे. ज्या बैठकीत हा प्लॅन आखण्यात आला होता त्या बैठकीला हा गोपनीय साक्षीदार उपस्थित होता. विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि सुदर्शन घुलेने (Sudharshan Ghule) हा प्लॅन आखला होता, असं गोपीनीय साक्षीदाराने म्हटलं आहे. 

बैठकीत नेमकं काय घडलेलं?

- बीड नांदूरफाटा येथे एका हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी झाली 

- विष्णू चाटेच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टी आयोजित केली गेली होती

- जेवण करत असताना विष्णू चाटे सुदर्शन घुलेला 6 डिसेंबरच्या वादावरून टोचून बोलत होता.

- तुला वॉचमनला मारायची काय गरज होती, आम्ही कमवायचे व तुम्ही गमवायचे असा चाटे घुलेला म्हणाला.

- आपले जीवन देखील कुत्र्यासारखे झाले आहे. तु तुझी इज्जत घातलीसच पण आमची देखील इज्जत घातलीस असेही चाटे घुलेला बोलला.

-त्यावर सुदर्शन घुले हा विष्णू चाटे यांस म्हणाला की, आम्ही सरपंचाला उद्या उचलून नेतो व त्याच्यावर ३७६ भादंविचा गुन्हा नोंदवतो. 

- त्यावर विष्णू चाटे हा सुदर्शन यास म्हणाला की, तुला काय करायचे ते कर, नाहीतर गावाकडे चितर, पाखरं, ससे सांभाळायचे काम कर...पण केजला येऊ नको.

त्या महिलेचा मृत्यू, अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ-

संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध होते असं भासवण्यासाठी एका महिलेचा वापर झाल्याचा आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला होता. त्या महिलेची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. धाराशिवमध्ये कळंबमधल्या द्वारका नगरीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झालाय. संतोष देशमुख प्रकरणी या महिलेची चौकशी झाल्याचं अंजली दमानियांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या मृत्यूची बातमी कळंब पोलिसांआधी बीड पोलिसांना मिळाली आणि यावर बोट ठेवत अंजली दमानियांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केलेत. मृतदेहाचे घटनास्थळीच पोस्टमार्टेम करून तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय. 

संबंधित बातमी:

700 गाड्यांच्या ताफ्यासोबत पवारांच्या राष्ट्रवादीत, 9 महिन्यांपासून फरार, जेलमध्ये समर्थकांकडून वाल्मिक कराडला मारहाण, कोण आहे बबन गिते?

Mahadev Gite: ब्रेकफास्टला तुरुंगातील बंदी उठली अन् डाव साधला, वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण करणारा महादेव गिते कोण?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Embed widget