IPL 2025 Ashwani Kumar: अश्वनी कुमार MI चा नवा भारतीय

IPL 2025 Ashwani Kumar: काल मुंबई विरुद्ध कलकत्ता या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई संघाला एक नवीन मॅच विनर सापडला..नाव आहे अश्वनी कुमार.स्वप्नवत पदार्पण.कुठल्याही भारतीय खेळाडूने केलेले आई पी एल मधील गोलंदाज म्हणून सर्वोत्कृष्ट पदार्पण...यासाठी मुंबई संघाच्या स्काऊट टीम चे सुद्धा खूप अभिनंदन करायला हवे. शेर ए पंजाब ही स्पर्धा खेळत असताना त्यांना हा सापडला..आणि आज या तरुणाने क्रिकेट च्या पंढरीत इतिहास घडविला. नाणेफेक जिंकून हार्दिक ने अपेक्षेप्रमाणे गोलंदाजीचा निर्णय घेतला..संध्याकाळी उत्तम स्विंग करणारे गोलंदाज मुंबई मध्ये अडचणीत आणू शकतात हा इतिहास आहे..आणि आज तो पुन्हा खरा ठरला.एका स्विंगिंग यॉर्कर वर सुनील नारायण त्रिफळाचित झाला... डी कॉक आणि अय्यर चा अडथळा चहर ने दूर केला...आणि मग एका स्वप्नवत पदार्पणाची सुरुवात झाली.
पहिल्यांदा उजव्या यष्टि बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला स्क्वेअर ड्राईव्ह करताना डीप पॉईंट ला पकडले..रिंकू सिंग ला इन साईड आउट खेळताना फसविले..मनीष पांडे आणि आंद्रे रसेल धोकादायक वाटत असताना स्क्रॅम्बल सीम चेंडू वापरून त्रिफळाचित केले...एका मागून एक बळी जात असताना कलकत्ता संघाकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न देखील झाला नाही याचे विशेष वाटते..ज्या संघाकडे चंद्रकांत पंडित प्रशिक्षक आहेत ते अशा गोष्टी सहन करीत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे. ..त्यामुळे सामना संपल्यावर त्यांची शाळा होईल हे नक्की.
अश्विनी कुमार याने आज आपल्या सर्वांच्या आशा उंचाविल्या आहेत..त्याचकडे सुंदर ऍक्शन आहे...चांगला बाउन्स आहे... स्विंग आहे....आणि सगळ्यात महत्त्वाचे त्याच्याकडे शिस्त आहे..आपल्याकडे नेहरा... आर. पी.. झहीर ही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीची काही नावाजलेली विद्यापीठे आहेत. ..या खेळाडूने त्यांचे मार्गदर्शन घेऊन आणि मेहनत करून आपला प्रवास चालू करावा...कारण आज सुद्धा भारतीय संघात झहीर नंतर कोण हाच प्रश्न आहे....मागे खालील अहमद ने थोड्या आशा दाखविल्या होत्या पण त्या आशाच राहिल्या.
११६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात रोहित गेल्यावर देखील उत्तम झाली...डावातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा शार्प इन स्विंग होऊन रोहितच्या यष्टांवरून गेला...पण रोहित ला या गोष्टीचा फायदा उठविता आला नाही..मात्र तो बाद झाल्यावर रिकलटण या फलंदाजाला मुंबई व्यवस्थापन का इतके हाय रेट करते हे त्याने दाखविले ..४१ चेंडूत ६२ धावा काढून स्पर्धेतील पाहिले अर्धशतक झळकविले... सूर्यकुमार यादव ने ९ चेंडूत २७ धावांची छोटी पण नयनरम्य खेळी...त्यात त्याने रसेल ला मारलेला पाचव्या ते सहाव्या स्टंप वरचा चेंडू डीप फाइन लेगवरून उभ्या उभ्या प्रेक्षकात भिरकावला...हा फटका पाहून स्वर्गात डब्ल्यू जी ग्रेस डोक्यावर हात मारीत असतील....कलकत्त्याच्या डावात फक्त एकच चांगली गोष्ट घडली अजिंक्य रहाणेने शॉर्ट कव्हर वर यंग चा घेतलेला सुंदर झेल..आजचा सामना जिंकून मुंबई ने विजयाची गुढी उभारली आहे..फक्त चाहते वाट पाहतात ते मुंबई चा राजा फॉर्ममध्ये येण्याची...


























