एक्स्प्लोर

मोठी बातमी : इमारतीचा पत्रा पडल्याने 8 मुलं गंभीर जखमी, ठाण्यातील घटना

Thane Iron Shead Fell on Football Turf : एका इमारतीचा पत्रा उडून खाली असलेला फुटबॉल टर्फवर पडल्यामुळे आठ मुलं गंभीर जखमी झाली आहे.

ठाणे : इमारतीचा पत्रा पडून ठाण्यात मोठी दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत 8 मुलं गंभीर जखमी झाली आहे. इमारतीचा पत्रा फुटबॉल टर्फवर पडल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील ही घटना समोर आली आहे. पत्रा पडून मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. ठाण्यातील गावंड बाग परिसरात एका इमारतीचा पत्रा उडून खाली असलेला फुटबॉल टर्फवर पडल्यामुळे त्या ठिकाणी खेळत असलेले आठ मुलं जखमी झाले.

इमारतीचा पत्रा पडून मोठी दुर्घटना

गावंड बाग परिसरातील फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते. यावेळी त्यांच्यावर इमारतीचा पत्रा पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना ठाण्यातील  बेथनी रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पत्रा पडून आठ जण गंभीर जखमी

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, फुटबॉल टर्फवर सर्व मुलं खेळत होती. लहान-मोठी सर्व मुलं खेळत होती. लहान मुलांना घरी पाठवण्यात आलं, त्यानंतर मोठी मुलं फुटबॉल खेळत होती. जोरदार पाऊस सुरु झाला, त्यासोबत सोसोट्याचा वारा सुरु झाला. जोरदार वाऱ्यामुळे बिल्डिंगवरचा पत्रा खाली कोसळला. पत्रा टर्फवर कोसळल्यामुळे आठ जणांना दुखापत झाली, त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही समोर आली आहे. 

फुटबॉल टर्फवर कोसळला इमारतीचा पत्रा

ठाणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसासह वादळी वाराही पाहायला मिळत आहे. यातच वाऱ्यामुळे पत्रा उडून थेट फुटबॉल टर्फवर कोसळून ही घटना घडली आहे. स्थानिक फुटबॉलपटूने दिलेल्या माहितीनुसार, या टर्फवर कोचिंगसुद्धा चालते. कोच इथे मुलांना ट्रेनिंग देतात. त्यामुळे इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक मुलं फुलबॉल खेळण्यासाठी येत असतात.

पाहा व्हिडीओ : फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांवर कोसळलं पत्र्याचं शेड, ठाण्यात 8 जखमी (Thane Shed Collapse on Turf)

जखमी मुलांची प्रकृती स्थिर

ठाण्यातील गावंडबाग परिसरात ठाणे महानगर पालिका टर्फ पार्क येथे काल रात्री 21:30 वाजताच्या सुमारास रौनक पार्क या सात मजली इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठाणे महानगर पालिका टर्फ पार्क, फुटबॉल ग्राउंड वरती पडल्यामुळे खेळत असलेले 17 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी जखमी झाले या जखमी मुलांना बेथनी हॉस्पिटल, दाखल करण्यात आले असून जखमी मुलांची प्रकृती स्थिर आहे. उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

बेपत्ता आजींचा मृतदेह सापडला; दोन दिवसांपासून झाडाखाली दबल्या, पण कुणालाच थांगपत्ता नाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Embed widget