Pune crime News : मुलंही असुरक्षित! तरुणाला नग्न करुन नाचायला लावलं अन् व्हिडीओ व्हायरल केला; पुण्यातील धक्कादायक प्रकार
तरुणाला कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि त्यासोबतच नाचतानाचा नग्न व्हिडीओदेखील व्हायरल केला आहे.

पुणे : पुण्यात सध्या मुलंही असुरक्षित (Pune Crime News) असल्याचं मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमधून समोर येत आहे. तरुणाला कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि त्यासोबतच नाचतानाचा नग्न व्हिडीओदेखील व्हायरल केला आहे. एवढंच नाही तर तरुणाकडून 60 हजार रुपयेदेखील उकल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकारासंदर्भात 33 वर्षीय पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवर सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर आयपीसी 392, 427, 500, 506, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार एकाच गावातील आहे. त्यांनी गावातील व्हॉट्सअॅप गृपवर हा नग्न व्हिडीओ शेअर केला. आरोपी असलेल्या सोमनाथने तक्रारदाराला भावाचं कारण देत घरी नेलं. त्याला थेट कपडे काढायला सांगितले. बाकी सगळे सहकारी त्याची मजा घेत होते. त्यानंतर सगळ्यांनी मिळून त्याला जबरदस्तीने नाचायला लावलं. तो नाचत असताना त्याचे व्हिडीओ काढले. एवढंच नाही तर तक्रारदाराचा मानसिक छळ करुन त्यांच्याकडून 60 हजार रुपये घेतले आणि त्याला मोबाईल जाळल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
गावातील Whatsapp गृपवर केला व्हायरल...
तक्रारदार आणि आरोपी एकाच गावातील आहे. त्यांनी आपल्याच मित्रासोबत हा प्रकार केला आणि गावातील Whatsapp गृपवर शेअर केला. त्यामुळे तक्रारदाराची गावात सगळीकडे बदनामी झाली. हाच व्हिडीओ पाहून आणि या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे.
पुण्यात मुलंही असुरक्षित?
पुण्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज नवे गुन्हे समोर येतात. लैंगिक अत्याचाराबारोबरच लहान मुलांचादेखील मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहेच, मात्र आता अल्पवयीन मुलांचंही शोषण होत आहे, त्यांचेही नग्न फोटो व्हायरल करण्याचे प्रकार पुण्यात सुरु असल्याचं या घटनांमधून समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच भांडणातील मुलांची नावं न सांगितल्यामुळे गुंडांच्या टोळीने अल्पवयीन मुलाला पळवून नेत त्याचे नग्न फोटो काढल्याची घटना समोर आली होती पुण्यातील तळजाई पठार परिसरात घडली होती.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
