Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरण : लेकाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई ढसाढसा रडली, शिवानी अग्रवाल म्हणाल्या...
Kalyani Nagar Pune Accident : पुणे अपघात (Pune Accident) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचा कथित व्हिडीओ आज (दि.23) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Kalyani Nagar Pune Accident : पुणे अपघात (Pune Accident) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचा कथित व्हिडीओ आज (दि.23) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून शिवीगाळ करण्यात आली होती. अखेर याबाबत भाष्य करण्यासाठी हिट अँड रन (Kalyani Nagar Pune Accident) प्रकरणातील आरोपीच्या आई शिवानी अग्रवाल अखेर समोर आल्या आहेत. त्यांनी या व्हिडीओबाबत भाष्य केलं आहे. शिवानी अग्रवाल यांनी एक व्हिडीओ शूट करुन शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) ढसाढसा रडताना दिसत आहेत.
शिवानी अग्रवाल काय म्हणाल्या?
मी शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) आहे. अल्पवयीन आरोपीची आई आहे. मी मीडियाला विनंती करते की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ तो माझ्या लेकाचा नाही. तो फेक व्हिडीओ आहे. माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे. मी पोलीस कमिशनरांना विनंती करते की, त्याला प्रोटेक्ट करा, असं शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) यांनी म्हटलं आहे. पोलिसांना त्यांनी मुलाला प्रोटेक्ट करण्याचे आवाहन केलं आहे.
कथित व्हायरल व्हिडीओमध्ये काय भाष्य करण्यात आलं होतं?
कथित व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा रॅप साँग म्हणताना दिसत होता. पुढील मजकूर त्याने व्हिडीओमध्ये रॅप साँग म्हणून गायला होता. "करके बैठा मै नशे...इन माय पोर्शे.. सामने आया कपल मेरे.. अब वो है निचे..साऊंड सो क्लिंचे सॉरी गाडी चढ आप पे...17 साल की उमर..पैसे मेरे बाप पे..1 दिन में मिल गयी मुझे बेल फीर से दिखा दुंगा सडक पे खेल...प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार"
येरवडा पोलीसांची चौकशी होणार
पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणी (Kalyani Nagar Pune Accident) येरवडा पोलीस ठाण्यात त्यावेळी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या नेतृत्वाखालील समिती येरवडा पोलिसांची चौकशी करणार आहे. दोन एफआयआर का नोंद करण्यात आल्या? कोणी दबाव आणला का? त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी कधी करण्यात आली? इत्यादी गोष्टींचा तपास होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या