एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंना घरघर का लागली?
गेल्या 35 वर्षात डीएसकेंनी अनेकांच्या घराला घरपण दिलं. पण आता त्यांच्या घरातील घरपणच हरवलं आहे आणि त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. डीएसकेंचा आतापर्यंतचा प्रवासावर एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट.
घराला घरपण देणारी माणसं... या टॅगलाईन खाली डीएसकेंनी घरं विकताविकता लोकांच्या भावनांना हात घातला आणि त्यांच्या मनावरही अधिराज्य केलं.
कधीकाळी पुण्यातील रस्त्यांवर भाजी विकणाऱ्या दीपक सखाराम कुलकर्णींनी शून्यातून साम्राज्य उभं केलं. फोन पुसता पुसता हा माणूस बिल्डर म्हणून नावारुपाला आला. सुरुवातीला बांधकाम व्यवसायात जम बसल्यावर त्यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्री, शाळा-महाविद्यालयं, हॉस्पिटॅलिटी अशा अनेक क्षेत्रात पाय रोवले.
पुण्यातील रस्ता पेठेतून सुरु झालेला त्यांचा व्यवसाय देशातच नाही तर इंग्लड-अमेरिकेतही पोहचला आहे. डीएसके विश्व उभारण्यासाठी त्यांनी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचा आधार घेतला. शेअर बाजारातून पैसा उभा केला. लोकांनी लाखो रुपये गुंतवले.
मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.
२०१४ पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.
स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.
सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.
इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप आहे.
घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचं असं का झालं?
- ड्रीम सिटी प्रोजेक्टसाठी डीएसकेंनी फक्त कागदी घोडे नाचवले.
- एका कंपनीची स्थापना केली.
- डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि त्यांचे नातेवाईक या कंपनीत भागीदार होते.
- कंपनीने शेतकऱ्यांकडून 55 लाख रुपये प्रतिएकर दराने जमीन खरेदी केली.
- 6 महिन्यात डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीला ही जमीन 1 कोटी 30 लाख रुपये प्रति एकर या दराने विकली
- यात हेमंती कुलकर्णी आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रति एकरी 75 लाख रुपयांचा नफा झाला.
- संपूर्ण व्यवहारात 165 कोटी रुपयांचा फायदा झाला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement