एक्स्प्लोर

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस!

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापठात विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस सापडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापठात (Savitribai Phule Pune University)  विद्यार्थ्यांच्या (Students)  जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या मेसमधील (Canteen) जेवणात आळी , झुरळे, पाल्टिक, केस इत्यादी गोष्टी निघणे हे आता नवीन राहिले नाही.  असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस सापडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 

विद्यार्थी आक्रमक

गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपहारगृह व भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थीचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अशा दोन समित्या गठीत केल्या आहेत. या समितीमधील विद्यार्थी प्रतिनिधी अधूनमधून भोजनगृहास भेटी देतात. आता पुन्हा एकदा मुलींच्या मेसमध्ये एका विद्यार्थ्यांनीच्या पोह्यांमध्ये आळी तर उपीट मध्ये केस दिसून आला आहे. विद्यापीठ प्रशासनाला थोडी जरी जनाची नाही तरी मनाची लाज वाटत असेल,  तर त्यांनी आता तरी या सर्व प्रकावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशा खड्या शब्दांत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला खडसावलं आहे.  

सर्व विद्यार्थी संघटना याविरोधात आवाज उठवतात. संबंधित मेस चालक बदला जातो. नवीन माणूस येतो. परंतु जेवणाचा दर्जा मात्र सुटत नाही. आमची विद्यापीठ प्रशासनास नम्र विनंती आहे की त्यांनी आता यावर कायमस्वरूपीचा मार्ग काढावा. अन्यथा असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन विद्यार्थ्यांच्या जीवास काही धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहिल, असंही विद्यार्थी म्हणाले आहेत. 

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!

यापूर्वी अनेकदा विद्यापीठात असे प्रकार समोर आले आहेत. अळी सोडली तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणात यापूर्वी झुरळदेखील आढळलं आहे. त्यावेळीदेखील विद्यार्थी आक्रमक झाले होते. मात्र अजूनही असे निष्काळजीपणाचे प्रकार विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये सुरु असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. पुणे विद्यापीठात राज्यातूनच नाही तर देशातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे इथली मेस चांगली असावी, अशी अनेक विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र विद्यार्थ्यांच्या जेवणात किंवा नाश्त्यात अळ्या आणि झुरळ निघाल्याचे प्रकार संपायचं नाव घेत नाही. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-

Ajit Pawar And Supriya Sule : बहिण- भाऊ पुन्हा एका मंचावर; अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा अबोला कायम राहणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget