एक्स्प्लोर

Kolhapur News : प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण; सीएम फडणवीसांसमोर कोल्हापुरात शिवप्रेमी आणि इंडिया आघाडी ठाम आंदोलन करण्यावर ठाम

Prashant Koratkar : जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांसोबत पोलिसांनी बैठक केली. मात्र, प्रशांत कोरटकरबरोबर केशव वैद्यवर देखील कारवाई करा अशी आंदोलकांची मागणी आहे. 

कोल्हापूर : प्रशांत कोरटकरने दिलेल्या धमकी प्रकरणी कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्यावर शिवप्रेमी आणि इंडिया आघाडी ठाम आहे. उद्या ( 6 मार्च) देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रशांत कोरटकरला 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळाला असल्याने आंदोलन स्थगित करा अशी पोलिसांची विनंती आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांसोबत पोलिसांनी बैठक केली. मात्र, प्रशांत कोरटकरबरोबर केशव वैद्यवर देखील कारवाई करा अशी आंदोलकांची मागणी आहे. 

पोलिसांना अजूनही कोरटकर सापडेना

दरम्यान, फरार असलेल्या प्रशांत कोरटकर व्हिडिओत म्हणतो की, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठा झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. छत्रपतीची राजधानी असलेला रायगडला अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मरदा मुजरा करतो असे कोरटकर म्हणताना दिसून येत आहे.  दरम्यान, प्रशांत कोरटकर हा व्हिडिओ व्हायरल करून प्रतिक्रिया देत असताना पोलिसांना मात्र अजून का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे प्रशांत कोरटकर मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर बालाघाटला पळाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असला, तरी अजून सापडलेला नाही. 

नागपूरमधील गुन्ह्याचा तपासही कोल्हापूर पोलिसांकडे 

दरम्यान, प्रशांत कोरटकर विरोधात नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपासही आता कोल्हापूर पोलीस करणार आहेत. नागपूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रितसर कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे तपासाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून नागपुरातील गुन्हाही कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करत तपासाची सूत्र त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू 

दरम्यान, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरनेच फोनवरून धमकी दिल्याचा उलगडा झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने सीडीआर मधून ही माहिती उघडकीस आणली आहे. त्यामुळे तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा प्रशांत कोरटकर तोंडघशी पडला आहे. प्रशांत कोरटकरने फोन करून थेट धमकी दिली, असे इंद्रजित सावंत यांनी ऑडिओ क्लीप समोर आणत सांगितले होते. सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केली. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ऑडिओ क्लीपमधून दिसून येते.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget