एक्स्प्लोर

Walmik Karad: वाल्मिक कराडला गोत्यात आणणारा सर्वात मोठा पुरावा समोर, खंडणी कनेक्शन सिद्ध करणारा व्हीडिओ पोलिसांना सापडला

Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात पोलसांनी वाल्मिक कराड याला एक नंबरचा आरोपी केले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड उर्फ 'आका'चा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात जाताना दिसत आहे. या हत्याप्रकरणात सीआयडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रातील तपशील आता हळुहळू समोर येत आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या वकिलांनी आतापर्यंत त्याच्या बचावासाठी कराड याने कोणाकडूनही थेट खंडणी न मागितल्याचे सांगितले जात होते. कोणत्याही व्यक्तीने वाल्मिक कराड याने खंडणी मागितली, अशी तक्रार केलेली नाही, असा युक्तिवाद वाल्मिक कराड याच्या वकिलांनी केला होता. मात्र, त्यांचा हा सगळा युक्तिवाद आता केराच्या टोपलीत गेला आहे. कारण वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीकडून मागण्यात आलेली 2 कोटी रुपयांची खंडणी याचा थेट संबंध दाखवून देणारा महत्त्वाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात या व्हिडीओचा उल्लेख केला आहे.

सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आवादा कंपनीत खंडणी मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुदर्शन घुले खंडणी मागतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला होता. या व्हिडीओतील संवाद आरोपपत्रात नमूद करणअयात आला आहे. या व्हिडीओ सुदर्शन घुले हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगत आहे की, " 100 लोक सांभाळण्याऐवजी एक कराड सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वाल्मिक अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरु होईल. गेल्यावेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती. माझ्याविरोधात तु्म्ही पोलिसांत तक्रार दाखल केली ही गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली आहे, ते तुमच्यावर संतापले आहेत. त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा अन्यथा तुमची कामं बंद केली जातील, अशी धमकी सुदर्शन घुले याने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. यावरुन खंडणी प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचे दिसत आहे. कोर्टात हा पुरावा वाल्मिक कराडसाठी मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. 

सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना नेमकं काय म्हणाला?

तुमचे आणि आण्णांचे बोलणे झाले होते का? तुम्ही का तस करताय? विनाकारण अडचणी वाढतील. मी इथे एकाच कारणामुळे आलोय, आण्णांचा फोन आला, काम बंद करा. पाठीमागे मी काम बंद केले होते त्यावेळी माझ्यावर तुम्ही एक एन. सी. दाखल केली होती. त्यामुळे अण्णांच्या मनात गैरसमज झाला होता. तुमचे चार-पाच ठिकाणी काम चालू आहेत, याची माहिती मी घेतली आहे. तुमचे कुठे कुठे काम चालु आहेत याची अण्णांना डायरेक्ट माहिती मिळते. मागच्यावेळी काम बंद केले होते, त्यावेळी सबटेशनचे काम चालू होते.  त्यावेळी मला फोन करुन अण्णांनी सबटेशनचे काम कसं चालू आहे, याबाबत विचारले होते. तुमच्या एक एक मिनीटाचे रिपोर्टिंग वाल्मिक अण्णा यांच्याकडे असते. अण्णांनी जी डिमांड ठेवली आहे, ती तुम्ही लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल, याकडे लक्ष द्या. तुम्हाला इथं काम चालू ठेवायचं असेल तर कुणालाही विरोध करा, पण फक्त अण्णांना विरोध करु नका. आज संध्याकाळ नंतर तुमचे सर्व काम बंद करा. आज अण्णा केज येथे तहसिलला येणार आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या व यांच्याशी बोला म्हणजे तुम्हाला काम बंद करायची गरज पडणार नाही. तुमचे इथे दीर्घकाळ काम चालणार आहे. तुम्ही अण्णांच्या डिमांड पूर्ण केल्यानंतर तिथे तुमचे सगळे प्रॉब्लम सॉल केले जातील. तुम्हाला इथे शंभर जण सांभाळण्यापेक्षा तिथं एकच जागेवर सेटलमेंट राहू द्या त्यानंतर तुम्हाला कुठंच काही करायची गरज पडणार नाही, असे सुदर्शन घुले या व्हीडिओत म्हणताना दिसत आहे.

पायात चप्पल न घालणाऱ्या वाल्मिक कराडकडे गोल्डन कलरचा आयफोन 16 प्रो, पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Satara Crime News: आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Embed widget