Singer Kalpana Raghavendar Attempted Suicide: प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन दिवसांपासून बंद घर, दरवाजा तोडल्यानंतर बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळली
Singer Kalpana Raghavendar Attempted Suicide: गायिका कल्पना राघवेंद्र यांनी तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.

Singer Kalpana Raghavendar Attempted Suicide: सिनेसृष्टीतून (Film Industry) एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर येत आहे. तेलुगु गायिका (Telugu Singer) आणि टीव्ही पर्सनॅलिटी कल्पना राघवेंद्र (Kalpana Raghavendar) यांनी हैदराबादमधील (Hyderabad) तिच्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायिका कल्पना राघवेंद्रचं घर दोन दिवसांपासून बंद होतं. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी गायिका बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यानंतर पोलिसांना तातडीनं गायिकेला रुग्णालयात दाखल केलं. असं सांगितलं जात आहे की, गायिकेनं झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, गायिकेनं एवढं मोठं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या गायिकेवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
गायिका कल्पना राघवेंद्र यांनी तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी, कल्पनाचं अपार्टमेंट दोन दिवस बंद असल्याची माहिती रहिवासी संघटनेनं दिल्यानंतर पोलीस तिच्या घरी पोहोचले आणि घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी गायिका तिच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळली.
घराचा दरवाजा दोन दिवस बंद
एबीपी देसमनं दिलेल्या वृत्तानुसार, कल्पना राघवेंद्रचं घर दोन दिवसांपासून बंद असल्याचं तिच्या सुरक्षा रक्षकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटना घडली त्यावेळी तिचा पती चेन्नईमध्ये होता.
View this post on Instagram
कल्पनानं झोपेच्या गोळ्या घेतलेल्या
पोलिसांना कल्पना 'बेशुद्ध' अवस्थेत आढळली आणि त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. केपीएचबी पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, डॉक्टरांच्या मते, गायकानं झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. अधिकाऱ्यानं सांगितलं की, अभिनेत्रीची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ती शुद्धीवर आल्यानंतर सर्व काही उघडकीस येईल. सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
1500 पेक्षा जास्त गाणी गायलीत
कल्पनानं वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 2010 मध्ये स्टार सिंगल्स मल्याळम जिंकला. यानंतर तिला लोकप्रियता मिळाली. त्यांनी इलैयाराजा आणि ए.आर. रहमानसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं आहे. तिनं 1500 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली.
कल्पनानं अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावलंय...
कल्पनानं काही काळ अभिनय क्षेत्रातही काम केलं. 1986 मध्ये कमल हासनच्या 'पुन्नगाई मन्नन' या चित्रपटात कल्पनानं एका छोटीशी भूमिका साकारली होती. याशिवाय, ती 'बिग बॉस तेलुगु' (सीझन 1) ची स्पर्धक देखील होती. 2024 मध्ये, तिनं 'केशव चंद्र रामावत' या तेलुगू चित्रपटातील 'तेलंगणा तेजम' या गाण्याला आपला आवाज दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























