Chhaava Box Office Collection Day 19: रिलीजच्या तिसऱ्या मंगळवारी 'छावा' धुवांधार; 'गदर 2', 'अॅनिमल'वर केली मात
Chhaava Box Office Collection Day 19: 'छावा'च्या कमाईत सातत्यानं घट होत आहे. तिसऱ्या सोमवारनंतर, तिसऱ्या मंगळवारीही चित्रपटानं एकेरी अंकात कमाई केली आहे. दरम्यान, सध्या 'छावा' 500 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.

Chhaava Box Office Collection Day 19: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कमाई करत आहे. या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि त्यासोबतच 'छावा'चा व्यवसायही झपाट्यानं वाढत आहे. चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांतच त्याचं बजेट वसूल केलं आणि आता तो प्रचंड नफा कमवत आहे. 'छावा'नं रिलीजच्या 19 व्या दिवशी म्हणजे, तिसऱ्या मंगळवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
19 व्या दिवशी 'छावा'नं किती पैसे जमा केले?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्याच्या कथेवर आधारित एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटातील दमदार अभिनयाबद्दल विक्की कौशलवर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचा आवडता चित्रपट बनला आहे, रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही 'छावा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची रांग लागली आहे. दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर, 'छावा'च्या कमाईला मोठा फटका बसला आहे, सध्या छावा सिंगल डिजिटमध्ये कमाई करत आहे. या सगळ्यामध्ये, जर आपण विक्की कौशल स्टारर चित्रपटाच्या कमाईबद्दल बोललो तर, सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार,
- 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 180.25 कोटी रुपये कमावले.
- तर 15 व्या दिवशी 'छावा'नं 13 कोटी रुपये कमावले.
- 16 व्या दिवशी चित्रपटाचं कलेक्शन 22 कोटी रुपये होते.
- 'छावा'नं 17 व्या दिवशी 24.25 कोटी रुपये कमावले.
- चित्रपटानं 18 व्या दिवशी 8.25 कोटी रुपये कमावले.
आता चित्रपटाच्या 19 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे
सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 19 व्या दिवशी 5.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, 'छवा' चित्रपटाचे 19 दिवसांत एकूण कलेक्शन 472 कोटी रुपये झाले आहे.
View this post on Instagram
'छावा'नं 19 व्या दिवशीही अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
'छावा' तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच त्याची कमाई कमी होऊ लागली. तिसऱ्या सोमवारनंतर आता तिसऱ्या मंगळवारीही 'छावा'च्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. दरम्यान, 19 व्या दिवशी, 'छावा' 5.5 कोटींच्या कलेक्शनसह सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि त्यानं इतर अनेक चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
- सलमान खानच्या 'सुल्तान'नं 19 व्या दिवशी 5.14 कोटी रुपये कमावले.
- गदर 2 नं 19 व्या दिवशी 5.1 कोटी रुपये कमावले.
- 19 व्या दिवशी 'अॅनिमल'नं 5 कोटी रुपये कमावले.
- 'जवान'नं 19 व्या दिवशी 4.9 कोटी रुपये कमावले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























