Kareena Kapoor Saif Ali Khan Divorce Prediction: "फक्त आणि फक्त दीड वर्ष, नंतर घटस्फोट..."; Kareena Kapoor, Saif Ali Khan च्या नात्यावर प्रसिद्ध ज्योतिषाचं धक्कादायक वक्तव्य
Kareena Kapoor Saif Ali Khan Divorce Prediction: करिना कपूर आणि सैफ अली खान बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट जोडप्यांपैकी एक. पण आता हे सेलिब्रिटी कपल लवकरच विभक्त होणार असल्याचा दावा एका ज्योतिषानं केला आहे.

Kareena Kapoor Saif Ali Khan Divorce Prediction: सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांना बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. पण, आता लवकरच हे सेलिब्रिटी कपल (Celebrity Couple) घटस्फोट (Divorce) घेणार असल्याचं बोललं जात आहे. सैफ आणि करिनाबाबत (Saif-Kareena) अशा चर्चा नाहीतर असं भाकीत करण्यात आलं आहे. एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या भाकीतानुसार, सैफिनाचं लग्न आता फार काळ टिकणार नसून येत्या दीढ महिन्यांतच दोघांचा काडीमोड होण्याची शक्यता आहे.
करिना कपूर आणि सैफ अली खान बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट जोडप्यांपैकी एक. दोघांच्या लग्नाला तब्बल 13 वर्ष पूर्ण झाली असून दोघांनाही दोन मुलं आहेत. मोठा तैमूर आणि लहान जहांगीर अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. पण, याच दरम्यान, युट्यूबवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ज्योतिषी सैफ अली खान आणि करिना कपूर खानच्या लग्नाबाबत बोलत आहे.
सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचं लग्न जास्त काळ टिकणार नाही, असा ज्योतिषाचा दावा आहे. सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखती बोलताना, ज्योतिषी सुशील यांनी सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या लग्नावर आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, ज्यावेळी सिद्धार्थनं त्यांना विचारलं की, तुमच्या मते सैफ अली खानवर हल्ला का झाला? त्यावेळी ज्योतिषी सुशील यांनी उत्तर दिलं की, "सैफ अली खान आणि करिना कपूर खान दोघांच्याही पत्रिका मी पाहिल्या आहेत. मी 2010 मध्येच भाकीत केलेलं की, दोघांचं लग्न फार काळ नाही चालणार, दोघेही आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहणार नाहीत.
"सैफवर झालेला हल्ला हा घरातील भांडणांमुळेही असू शकतो. दोघांमधील ज्या काही गोष्टी आहेत, त्या सॉल्व होणार नाहीत, फक्त आणि फक्त दीढ महिन्यांतच दोघांचा घटस्फोट होईस...", असा दावा ज्योतिषानं केला आहे.
दरम्यान, सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात घुसून चोरट्यानं हल्ला केला होता. खरंतर हा चोर सैफचा लहान मुलगा जहांगीरच्या खोलीत शिरला होता. तेवढ्यात सैफ तिथे पोहोचला आणि त्याच्यावर चोरानं हल्ला केला आणि तिथून पळ काढला. सैफ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाठीतून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढला होता. तर, त्याच्या मानेवरही चोरानं धारधार शस्त्रानं वार केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























