Gautam Gambhir and Suryakumar Yadav : कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
Gautam Gambhir and Suryakumar Yadav : प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारल्यापासूने टीम इंडियाला आव्हानात्मक कसोटी क्रिकेटमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
Gautam Gambhir and Suryakumar Yadav : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाल्यापासून भारतीय थिंक टँकच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारल्यापासूने टीम इंडियाला आव्हानात्मक कसोटी क्रिकेटमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. तथापि, T20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताची कामगिरी अत्यंत चमकदार राहिली आहे. कारण त्यांनी सलग चार T20 मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे कसोटीत कसोटी लागली असताना टीम इंडियाचे गुरुजी गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांची टी-20 मध्ये चांगलीच जमल्याचे दिसून येत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही टीम इंडियाने शानदार विजय मिळवला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची टी-20 मध्ये दमदार कामगिरी होत असल्याने सूर्याही पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान गौतम गंभीर यांच्यासोबतच्या त्याच्या नातेसंबंधाबद्दल बोलला होता.
GAMBHIR 🤝 SURYAKUMAR IN T20I:
— Johns. (@CricCrazyJohns) January 26, 2025
- Won, Won, Won, Won, Won, Won, Won, Won. pic.twitter.com/Jtcww0Vmto
सूर्या म्हणाला की, मी चार वर्षे गंभीर यांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे, त्यामुळे ते कसे काम करतात हे मला माहीत आहे. त्यांच्याशी न बोलताही, आम्हाला काय करायचे आहे ते आम्हाला माहीत आहे कारण ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नव्हते कारण तो त्यांच्यासोबत तयारी करत होता. आम्ही त्याच्यासोबत योग्य दिशेने वाटचाल करत आहोत, ते खेळाडूंना स्वतःला व्यक्त करण्याची परवानगी देतात, त्यांना माहित आहे की खेळाडूच्या मनात काय चालले आहे आणि वातावरण हलके आणि गोड ठेवतात.
Most wins as Indian Captain in T20I:
— Johns. (@CricCrazyJohns) January 25, 2025
Rohit - 50 wins (62 matches)
Dhoni - 42 wins (72 matches)
Kohli - 32 wins (50 matches)
Surya - 16* wins (19 matches) pic.twitter.com/ibBxc8llcq
पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारताच्या तयारीची रूपरेषा सांगताना सूर्यकुमार यादव म्हणाला, "माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे की T20 विश्वचषक स्पर्धेला एक वर्ष बाकी आहे, पण मला त्याबद्दल विचार करायचा नाही. त्याऐवजी आम्ही त्या स्पर्धेची वाट पाहत आहोत. "आम्हाला आतापर्यंतच्या प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. आम्हाला एक संघ तयार करायचा आहे, कोणते फलंदाज कोणत्या परिस्थितीत चांगले काम करतात आणि कोणते गोलंदाज तुम्हाला सामने जिंकू शकतात हे समजून घ्यायचे आहे."
तो पुढे म्हणाला की, "कोणत्याही गटासाठी भरपूर सामने खेळणे खूप महत्त्वाचे असते. गौतीभाई आणि मी यावर विचार करू. आशिया कप आणि टी-20 विश्वचषकापर्यंत आम्हाला या गटासोबत खेळायचे आहे."
इतर महत्वाच्या बातम्या