Ajit Pawar And Supriya Sule : बहिण- भाऊ पुन्हा एका मंचावर; अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा अबोला कायम राहणार?
आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत. पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलंय.
पुणे : आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत. पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस,खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील माळवाडीमधील परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम जरी विकास कामांचा असला तरी या कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर लक्ष असणार आहे.
पुण्यातील वारजे हा परिसरात बारामती लोकसभा मतदार संघाचा भाग आहे. खडकवासला लोकसभा मतदार संघात हा भाग येतो. या भागातील स्थानिक कार्यकर्ते शरद पवारांच्या गटात आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंचं नाव नाही आहे. मात्र बैठक व्यवस्थेत त्यांच्या नावाची खुर्ची आहे.
शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या नावाची बारामती लोकसभेसाठीच्या उमेदवारीची अधिकृतपणे घोषणा केली. भोर विधानसभा मतदार संघात शरद पवारांनी ही घोषणा केली. त्यामुळे बारामतील नणंद- भावजय यांच्या बारामतीत लोकसभेची लढत होणार आहे, असं स्पष्ट झालं आहे. यंदा पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे आणि या लढतीकडे राज्याचं राजकारणाचं लक्ष लागलं आहे.
काही दिवसांपूर्वी नमो रोजगार मेळाव्यात सगळ्यांचं लक्ष अजित पवारांच्या हालचालींकडे लागलं होतं. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र नेहमीच एकत्र असलेले बहिण-भाऊ आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मात्र दोघांनीही एकमेकांकडे बघणं देखील टाळलं होतं. बहिण भाऊ काका एकत्र आले, पण अबोला ठळक दिसला फडणवीसांची अजितदादांवर हळूच मिश्कील टिप्पणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दोघे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे दोघांमध्ये काही चर्चा होते का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. सुप्रिया सुळेया गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहेत. त्यात या नणंद भाजवज एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरणार आहेत तर शरद पवार लेक सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरले आहेत.
इतर महत्वाची बातमी-