एक्स्प्लोर

Pune News : EVM मशीन ठेवलेल्या गोदामातलं फायर अलार्मचं सायरन वाजलं अन् धावपळ सुरु झाली, नेमकं काय घडलं?

ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क  गोदामाच्या फायर अलार्ममध्ये झालेला तांत्रिक बिघाड भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुरूस्त करण्यात आला.

पुणे : ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आलेल्या (Electronic Voting Machine)   कोरेगाव पार्क येथील फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या  गोदामाच्या फायर अलार्ममध्ये झालेला तांत्रिक बिघाड भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुरूस्त करण्यात आला असून सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात लोकसभा निवडणूकीसाठी वापरण्यासाठी प्रथमस्तरीय तपासणी झालेले ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास या गोदामातील फायर अलार्ममध्ये बिघाड होऊन सायरन अचानक वाजण्यास सुरूवात झाली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला दिली आणि अग्निशमन सिलेंडर्स तिथे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन वाहनही मागविण्यात आले. गोदामाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.  तपासणी नंतर  तंत्रज्ञांनी फायर अलार्ममधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराची माहिती तात्काळ निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली व बिघाड दुरुस्त करण्यासाठी परवानगी घेण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सकाळी 10:30 वाजता राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समक्ष गोदाम उघडण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

गोदमच्या आतील सर्व यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून बिघाड दुरुस्त करण्यात आला. राजकीय पक्ष प्रतिनिधींनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. संपूर्ण प्रक्रीयेचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करण्यात आले असून याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबी संदर्भात अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त होताच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारीच्या अतिरिक्त उपाययोजना करण्यात येतील असे  जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे म्हणाले, गोदामात अग्निशमन यंत्रणा आहे आणि कडक सुरक्षा व्यवस्थादेखील आहे. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या प्रकाराची माहिती प्रशासनाने  निवडणूक आयोगाला दिली असून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष आवश्यक दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत आहे. ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

इतर महत्वाची बातमी-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासाBeed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट, बिर्याणी अन् मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉकटाईमTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
Eknath Shinde on Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
Sanjay Raut: आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Embed widget