एक्स्प्लोर

माता न तू वैरिणी...! एक लाख रुपयांसाठी आईने पोटच्या मुलाला विकले, पुण्यातील घटना

Pune Crime News :  ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News :  ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षाच्या मुलाला विकल्यानंतर आईने पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना झाली, या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.  

पुण्यातील कोथरूड परिसरातून एका चार वर्षीय चिमुरड्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवातही केली. पण या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या मुलाच्या आईनेच एक लाख रुपयांत या मुलाची विक्री केल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नाही तर आईने ज्या व्यक्तीला हा मुलगा विकला होता, त्याने आणखी एका व्यक्तीला त्या मुलाची विक्री केल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आठ जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आईने तक्रार दाखल झाल्यानंतर गांभीर्य लक्षात घेऊन तपास आधिक वेगाने सुरु केला. कोथरुड, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यामार्फत 9 तपास पथकांमार्फत चिमुरड्याचा शोध सुरु केला. अपहरण झालेला मुलगा त्याच दिवशी बांगडीवाली भाभीसोबत (जन्नत बशीर शेख) होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन तपास सुरु केला. तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्या महिलेनं उडवाउडवीची उत्तरे दिली. पण खाकी दाखवल्यानंतर ती सर्व काही बरळली. ही चौकशी सुरु असताना दुसऱ्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्येही एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या महिलेची कसून चौकशी केली. त्यावेळी तीने गुन्ह्याची कबूली दिली. 

जन्नत बशीर शेख हिने सांगितले की, रेश्मा सुतार आणि तक्रार करणारी प्रियंका पवार यांच्या संगणमत व कट करुन चिमुकल्याचे अपहरण केलं. हा मुलगा तुकाराम निंबळे, मावळ याच्या मध्यस्थीने पनवेलमधील चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना एक लाख रुपयांना विकला. पोलिसांनी तात्काळ जन्नत या दोघांचा शोध घेतला. पनवेल पोलिसांशी संपर्क साधत पुढील कारवाई ठरवली. पेनवेल पोलिसांनी तात्काळ चंद्रकला माळी आणि भानुदास माळी या दोघांना ताब्यात घेत मुलांबाबत विचारपूस केली. हा मुलगा एक लाख साठ हजार रुपयांना दिपक तुकाराम म्हात्रे, रायगड यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रायगडमध्ये जात आरोपीला ताब्यात घेतलं अन् मुलाची सुटका केली. पोलिसांनी भादवि कलम 370, 368, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.  या सर्वांना न्यायालयात हजर केले असतान 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का? हे रॅकेट किती मोठं आहे... याबाबत पोलिस तपास करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Dattatray Gade :नराधम दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळा घटनाक्रम सांगितला...
दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Javed Akhtar Speech MNS Program : मनसेचा मराठी भाषा दिननिमित्त कार्यक्रम, जावेद अख्तर यांचं भाषण, कोणती कविता केली सादर?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 27 February 2025Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविताSpecial Report | Swargate Crime Accuse | ताफा भलामोठा, नराधम बेपत्ताच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Dattatray Gade :नराधम दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळा घटनाक्रम सांगितला...
दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
Dattatray Gade Arrested : मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश, गुनाटच्या गावकऱ्यांची पोलिसांना साथ
मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
EPFO 31 मार्च पर्यंत महत्त्वाचं एक काम पूर्ण करणार, जूनपासून बँकिंग प्रमाणं सेवा मिळणार, पैसे काढणं सोपं होणार
EPFO 3.0 चं काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार, जूनपासून बँकिंगप्रमाणं सेवा देणार, पीएफ काढणं सोपं होणार
Embed widget