पुण्यात निर्घृण हत्या, हात-पाय आणि शीर तोडलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
Pune News Update : पुणे येथील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्घूण खून झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Pune News Update : पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात पिंपरी सांडस येथील भीमा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून आणि शीर कापलेला मृतदेह सापडला होता. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह संतोष गायकवाड यांचा असल्याची माहिती मिळाली.
मृत संतोष मासेमारीचा व्यवसाय करत होते. ते मंगळवारी भवरपूर येथून बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते. परंतु, वाटेतच त्यांची हत्या झाली. गेल्या अनेक वर्षांपासून संतोष हे भीमा आणि मुळा मुठा नदीवर मासेमारीचा व्यवसाय करत होते.
दरम्यान, अशाप्रकारे निर्घृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अद्यापही संपूर्ण मृतदेह सापडला नाही. मृतदेहाचे दोन्ही पाय आणि एक हात गायब असल्याने पोलीसही चांगलेच चक्रावले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेचे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांना याबाबत जास्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही. परंतु, संतोष यांचा कोणासोबत वाद होता का? अशा प्रकारे निर्घूण खून करण्या मागचे कारण शोधण्यासाठी पुणे पोलीस कसून तपास करत आहेत. पोलीस या खूनात सहभागी असणाऱ्यांचा लवरच शोध घेतील असे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल
- Blockchain Wedding : पुण्यात चक्क ब्लॉकचेनद्वारे विवाहसोहळा, देशातील अशाप्रकाराचं पहिलेच लग्न
- काँग्रेस स्वतःची फरफट करणार नाही, काँग्रेसचं बळ इतर नेत्यांनी ठरवू नये; नाना पटोलेंचे अजित पवारांना उत्तर