Maharashtra Weather Update : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ज्यात सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं आहे.
Maharashtra Weather Update : पुण्यासह राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु (Maharashtra Weather Update ) आहे. मात्र 2 जुलै आणि 3 जुलैनंतर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता असल्याचं भाकित भारतीय हवामान विभागानं वर्तवलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यासोबतच संपूर्ण देशात जुलै महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं आहे.
हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर (K S Hosalikar) यांनी ट्वीट केले आहे आणि त्यात राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. 'येत्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असून 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता, त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागात आणि संलग्न भागावर होण्याची शक्यता आहे. राज्यातही 4, 5 दिवशी त्याचा प्रभाव असेल', असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर जून महिन्यात सरासरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या पेरण्या रखडल्या. राज्यात अद्याप शेतांमध्ये पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. देशात 1 जून ते 30 जूनमध्ये 148 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे सामान्याहून 10 टक्क्यांनी कमी आहे.
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर यलो अलर्ट
कोकण सोडल्यास महाराष्टातील इतर भागात मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश मधील कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल उत्तर प्रदेशकडे होत असल्यानं पावसाचा वेग कमी होणार असल्याचं वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात 1 आणि 2 जुलैला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update : मुंबईत किती पाऊस झाला?
सांताक्रुज - 90.2 MM
कुलाबा - 25.8 MM
Maharashtra Weather Update : पुणे जिल्ह्यात किती पाऊस झाला?
लवासा- 83.0 MM
शिवाजीनगर- 5.9MM
लोणावळा- 79.0 MM
कोरेगाव पार्क- 4.0 MM
निमगिरी- 56.5 MM
हडपसर- 4.0MM
गिरीवन-50.0 MM
बारामती- 4.0 MM
माळीण-45.5 MM
वडगाव शेरी-305MM
तळेगाव- 17.5 MM
नारायणगाव-3.0MM
खेड- 17.5MM
पुरंदर- 2.5 MM
चिंचवड- 15.5MM
हवेली- 2.0 MM
एनडीए- 14.0 MM
आंबेगाव- 2.0 MM
दौंड-1.0 MM
राजगुरुनगर- 10.5 MM
लवळे- 1.0 MM
मगरपट्टा- 0.5 MM
पाषाण- 7.0 MM
शिरूर- 0.5 MM
येत्या 5 दिवसात राज्यात 🌧 मुसळधार ते 🌧🌧 अती मुसळधार पावसाची शक्यता असून;
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 30, 2023
🚩 2 जुलै पासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता, त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत व संलग्न भागावर होण्याची शक्यता. राज्यातही 4,5 दिवशी ते याचा प्रभाव असेल. https://t.co/xBKNQdPUls