एक्स्प्लोर
सिंहगडावरुन कोसळूनही 8 महिन्यांची गर्भवती सुरक्षित
सिंहगडावर सेल्फी घेताना प्रणिताचा तोल गेला आणि ती 150 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ज्या ठिकाणी ती पडली तिथे घनदाट झाडी होती. स्थानिकांनी दीड तासाने तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं.

प्रातिनिधीक फोटो
पुणे : 150 फुटांवरुन खाली पडल्यानंतरही एक आठ महिन्यांची गर्भवती सुरक्षित राहिली. पुण्यातील सिंहगडावर घडलेला हा प्रकार चमत्कारापेक्षा कमी नाही.
28 वर्षीय प्रणिता इंगळे आपल्या पती आणि भावासह सिंहगडावर गेली होती. गडावर पोहोचल्यावर सगळ्यांनी निसर्गाचा आस्वाद घेतला आणि फोटोही काढले. पण याचवेळी एक अपघात झाला, ज्यात प्रणिताचा जीवही गेला असता.
सिंहगडावर सेल्फी घेताना प्रणिताचा तोल गेला आणि ती 150 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ज्या ठिकाणी ती पडली तिथे घनदाट झाडी होती. स्थानिकांनी दीड तासाने तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. प्रणिता आणि बाळ सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
प्रणिताचा पती लहू इंगळे एक टूर ऑपरेटर आहे. "मागील आठवड्यात लहू प्रणिताला गोव्याला घेऊन गेला होता. गोव्याहून परताना आम्ही प्रणिताचा भाऊ सुरेश जगतापला भेटण्यासाठी पुण्यात थांबलो. त्यानंतर फिरण्यासाठी शनिवारी संध्याकाळी सिंहगडावर पोहोचला. सिंहगड घाट स्टेशनच्या आत गाड्या जात नाहीत. त्यामुळे गाडी बाहेरच पार्क करुन आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. आम्ही सुमारे अर्ध्या तास गडावर पोहोचलो," असं लहू इंगळेने सांगितलं.
लहू इंगळे म्हणाला की, "फोटो क्लिक करताना अचानक प्रणिताचा पाय निसटला आणि ती पडली. आम्ही आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक तातडीने मदतीला पुढे आले आणि तिला बाहेर काढलं."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
