एक्स्प्लोर

Nagpur ZP : नव्या चेहऱ्यांना संधी; नेत्यांच्या पुत्रांना सुनील केदारांनी लांबच ठेवलं, नागपूर झेडपीत नेमकं काय घडलं?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केलेले, ज्येष्ठ सदस्य आणि नेत्यांच्या पुत्रांना सभापतिपदांपासून लांब ठेवत आश्‍चर्यकारकपणे केदार यांनी नवख्यांच्या हाती सभापतिपदांची धुरा दिली आहे.

Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक यशस्वी खेळी करून आपले सदस्य निवडल्यानंतर सभापतिपदांच्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदारांनी (Sunil Kedar) राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) एकच सभापतीपद दिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केलेले, ज्येष्ठ सदस्य आणि नेत्यांच्या पुत्रांना सभापतीपदांपासून लांब ठेवत आश्‍चर्यकारकपणे केदारांनी नवख्यांच्या हाती सभापतीपदांची धुरा दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे सुपुत्र सलील (Saleel Deshmukh) आणि माजी मंत्री रमेश यांचे पुत्र गुड्डू बंग यांना सभापती म्हणून बढती दिली जाईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण केदारांनी नवख्यांना संधी देत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. सत्ता स्थापनेसाठी इतरांची गरज नाही. असे असले तरी भाजपतर्फे फोडाफोडीचा धोका असल्याने त्यांनी राष्ट्रवादीलाही सोबत ठेवले. सुरुवातीला राष्ट्रवादीच्यावतीने उपाध्यक्षपदावर दावा केला होता. मात्र, केदारांनी तो फेटाळून लावला. 

चर्चेत असणारी नावे डावलली

राष्ट्रवादीने दोन सभापती देण्याची मागणी केली होती. पण केदारांनी एका जागेवर बोळवण केली. मागील निवडणुकीत तत्कालीन महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांना सभापतिपद देण्यास राष्ट्रवादी इच्छुक नव्हती़. गुड्डू बंग आणि सलील देशमुख यांना पदे मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह होता. काँग्रेसने बोढारेंना बळ देत दोन्ही नेत्यांना शह दिला. यावेळी भिष्णूर सर्कलचे बाळू जोध यांना संधी दिली़. जोध यांच्या विरोधात आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजप उमेदवाराला समर्थन दिले होते. जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ सदस्य आणि अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान बंडखोरी केलेल्यांना कुठलेही स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, चर्चेत असणारी नावे डावलली गेली आणि आश्चर्यकारकरीत्या नवख्यांच्या हाती विषय समितीच्या सभापतिपदाची सूत्रे देण्यात आली आहे. 

बंडखोर सभापतीपदापासून कोसो दूर

रामटेक मतदारसंघातून शांता कुमरे, दुधाराम सव्वालाखे हे दावेदार होते मात्र, स्थानिक रामटेक तालुक्यातील दोघांनाही डावलण्यात आले. पारशिवनीला हा मान देण्यात आला़. माजी मंत्री केदारांचे अत्यंत विश्वासू राजू कुसुंबे यांच्या गळ्यात माळ पडली. कामठी मतदारसंघातील ज्येष्ठ सदस्य व बंडखोर नाना कंभाले यांना सभापतिपदापासून कोसो दूर ठेवले़. सुरेश भोयर गटाचे दिनेश ढोले स्पर्धेत होते़. त्यांना बाजूला सारत अवंतिका लेकुरवाळेंना संधी देण्यात आली़. उमरेड मतदारसंघात अभ्यासू व ज्येष्ठ सदस्य अरुण हटवार शर्यतीत होते. परंतु, युवा सदस्य मिलिंद सुटे यांच्या गळ्यात अचानक सभापतीपदाची माळ पडली़. ज्येष्ठ सदस्यांना डावलण्यात आल्याने कालपासून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

महत्त्वाची बातमी

शासकीय हॉस्पिटलला नोकरी करणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करणे पडले महागात!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget