लाडकी बहिण कोणाची, मुख्यमंत्र्यांची की उपमुख्यमंत्र्यांची? अमोल कोल्हेंची टीका, म्हणाले, " बहीण विचारते ओवाळणी दिली पण.."
जालन्यात आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे बोलत होते.
Jalna: लाडकी बहिण नक्की कोणाची हेच कळेना, मुख्यमंत्र्यांची की उपमुख्यमंत्र्यांची? असं म्हणत राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. बहीण विचारते ओवाळणी दिली पण दाजीच्या सोयाबीन च्या भावाचे काय? बहीण विचारते भाच्याच्या नोकरीचन काय लग्नाच काय? असे सवाल करत विधानसभा निवडणूका पुढे टाकण्याचं कारस्थान रचलं जातंय. त्यांना कळून चुकलंय महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. असंही ते म्हणालेत.
जालन्यात आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे बोलत होते. या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अनेक ठिकाणी बांगलादेशमधील हिंदू अत्याचारावर निघत आहेत. एकाच वेळी काही गोष्टी घडताहेत. अचानक एका महंताला बोलावं लागतं त्यामुळे शंका येते. असं म्हणत त्यांनी रामतीर्थांच्या वक्तव्यावरून सरकारवरही हल्ला चढवला.
लाडकी बहिण नक्की कोणाची?
राज्यात विधानसभा निवडणूका जवळ येत असून दुसरीकडे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून विरोधी पक्ष जोरदार टीका करत असताना राष्ट्रवादीच्या जालन्यातील शिवतीर्थ यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहिण नक्की कोणाची? मुख्यमंत्र्यांची की उपमुख्यमंत्र्याची हे कळत नसल्याचे सांगत सरकारला टोला लगावला. सगळे योजनांचे पैसे मतांची बेगमी करण्यासाठी वळतात का? बहीण विचारते ओवाळणी दिली पण दाजीच्या सोयाबीन च्या भावाचे काय? बहीण विचारते भाच्या च्या नोकरीचन काय लग्नाच काय? असे सवालही त्यांनी केले. भारतावर 205 लाख कोटी रुपयांच झालाय, अंतर्राष्ट्रीय नाणेनिधीने देशाला इशारा दिलाय, अशीच स्थिती राहिली तर देशात श्रीलंकेसारखी स्थिती होईल. असेही ते म्हणाले.
विधानसभेच्या निवडणूका पूढे ढकलण्याचं कारस्थान
विधानसभेच्या निवडणूका पुढे ढकलण्याचं कारस्थान रचलं जातंय. हे त्यांनाही कळून चुकलंय महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. दरम्यान, परभणीच्या शिवतीर्थ यात्रेतही त्यांनी यावरून सरकारवर घेरल्याचं पहायला मिळालं. ते म्हणाले, महायुती सरकारनं त्यांच्या दिल्लीतील पिताश्रींना सांगितलं, तेवढं निवडणूक आयोगाला सांगा, कुठलातरी क्लॉज वापरा. 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर होत नाही.
माननीय निवडणूक आयोगानं पाऊस पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारणं दिली असली, तरी महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, सरकारचं धाकधुक धाकधुक व्हायला लागलंय आणि म्हणूनच निवडणूक पुढे ढकलंली.", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा: