एक्स्प्लोर

Photography Day 2024 : एका कॅमेरामुळे बदलले आयुष्य! कलेप्रती फेडले ऋण, प्रतिकूल परिस्थितीवर मात, फोटोग्राफी दिनानिमित्त एका युवकाची कहाणी 

Photography Day : आयुष्याला दिशा देणाऱ्या लक्ष्मीला आपल्या घरावर त्याने स्थान दिले, आज फोटोग्राफी दिनाची कॅमेरामुळे आयुष्य बदललेल्या युवकाची कहाणी जाणून घ्या

Photography Day 2024 : ज्या क्षेत्रात आपण काम करतो ज्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते, मग तो व्यवसाय असो वा नोकरी अथवा कलाकार क्षेत्र, प्रत्येकाला त्या क्षेत्राचा अभिमान असतोच, परंतु तो अभिमान शब्दातूनच अधिक प्रमाणात व्यक्त केला जातो. मात्र जी कला आधी आत्मसात केली. नंतर ती व्यवसायाच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी ठरली, तर तिच्या प्रती ऋण व्यक्त करताना त्यांनी कलेला प्रत्यक्षात आपल्या घराच्या प्रतिकृतीतून जगासमोर मांडणं ही गोष्ट कौतुकास्पद आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरते. आणि हेच काम आष्टीचे फोटोग्राफर सचिन रानडेंनी केलंय. कलेप्रती आदर म्हणून आपल्या नवीन बांधलेल्या घरावर कॅमेराची प्रतिकृती साकारून केले आहे. आज फोटोग्राफी दिनाची कॅमेरामुळे आयुष्य बदललेल्या युवकाची कहाणी जाणून घ्या...

अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात 

आष्टी येथील फोटोग्राफर सचिन रानडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेल्या 17 वर्षांपासून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून इमानदारीने काम करत आष्टी शहरासह संपूर्ण तालुक्यात आपल्या कलेची चुणूक दाखवत आठवणीत राहतील, असे काही छायाचित्र टिपले. शिवाय या कलेच्या माध्यमातून आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे काम केले. रोल कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास आधुनिक काळातील डिजिटल कॅमेराकडे वळला आहे. काळानुरूप व्यवसायातील बदल लक्षात घेऊन अत्याधुनिक साधनसामुग्री त्याच्याकडे आहे. काही वर्ष अनेक वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणूनही सचिन रानडे यांनी काम केल आहे. त्यामुळे सचिन रानडे यांची ओळख आणखी मोठ्या प्रमाणात झाली.

कॅमेऱ्याने आयुष्याला दिशा दिली...

सचिन रानडे म्हणतात, परिस्थितीने सर्व बाजूंनी ग्रासल्यानंतर मला काहीतरी मार्ग शोधणे क्रमप्राप्त होते. कुठलाही रोजगार नव्हता साहजिकच ऐन तरुण वयात दिशा मिळणे कठीण होते. मात्र अशा वेळी मला फोटोग्राफर व्हावंसं वाटलं. कारण त्या वेळी रोल कॅमेरे होते. रोल कॅमेरावर परिपूर्ण शिक्षण होतंय तोच डिजिटल कॅमेऱ्याने या क्षेत्रात पदार्पण केले. आणि मग तिथूनच मग माझी यशस्वी वाटचाल सुरू झाली. आष्टीकरांनी या व्यवसायात मला खूप मदत केली. व्यवसाय म्हणून न बघता मी याकडे एक कलाकार म्हणून पाहतो. म्हणूनच ज्या कॅमेराने माझ्या आयुष्याला उभारी दिली आणि माझ्या आयुष्याला दिशा दाखवण्याचे काम केले.

घरावर कॅमेराची प्रतिकृती साकारली

त्या कलेप्रती कुठेतरी ऋण फेडता येतील का? हा प्रश्न होता. मात्र घर बांधकाम केले आणि त्याचवेळी ठरवलं की, आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या लक्ष्मीला आपल्या घरावर प्रतिकृतीच्या माध्यमातून साकारायचे असे ठरवले आणि मी माझ्या घरावर कॅमेराची प्रतिकृती साकारली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025  06AM SuperfastCRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफारDhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget