एक्स्प्लोर

Palghar : दुर्दैवी! पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

Palghar Two Drowned : पालघर येथे वैतरणा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Two Drowned in Vaitarna River : पालघर ( Palghar ) येथे पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू ( Two Drowned ) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैतरणा नदीमध्ये ( Vaitarna River ) पोहण्यासाठी ( Swimming ) गेलेल्या दोन तरुणांचा बुडून (Two Young Died ) मृत्यू झाला. शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. वाडा तालुक्यातील ( Wada District ) आवंढे ( Aawandhe ) येथील वैतरणा नदीत ( Vaitarna River ) पोहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू ( Palghar Two Drowned ) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेचा सुमारास ही घडना घडली.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाले

वैतरणा नदीत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ठाणे येथील रहिवासी असलेले सुनील बाबू डिके ( वय 30 ) आणि कार्तिक जाणू कोदे ( वय 17 ) हे दोघे तरुण पोहण्यासाठी आले होते. दोघे तरुण वाडा तालुक्यातील आवंढे येथे वैतरणा नदीत पोहण्यासाठी उतरले होते, मात्र नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे दोघे तरुण बुडाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी एका तरुणाचा मृतदेह हाती

काल संध्याकाळी दोघे तरुण बुडाले. उपस्थितांनी आरडा ओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सुनील या तीस वर्षीय तरुणाला पाण्याबाहेर काढलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना सुनीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काळोख झाल्याने दुसऱ्या तरुणाच्या शोधकार्यात अडचणी येत होत्या त्यामुळे रात्री शोधकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर आज पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं. 

आज दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

आज पहाटेच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने बुडालेला दुसरा तरुण कार्तिकचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. वाडा तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असताना देखील फायरब्रिगेड आणि नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री आणि बचावपथक उपलब्ध नसल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाड्यात अग्निशमन दल यंत्रणा आणि नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी आवश्यक असणारी जीवरक्षक टीम कधी स्थापन केली जाणार असा सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे; तपास CBI कडे देण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget