Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वरच्या घटनेप्रकरणी पराचा कावळा, स्थानिकांची नाराजी, बैठकीत काय घडलं?
Nashik Trimbakeshwer : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेले व्हिडिओ, नकारात्मक बातम्यांमुळे वातावरण बिघडत गेलं.
Nashik Trimbakeshwer : उरूस परंपरेबद्दल त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहरामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह असून काही लोक म्हणतात, परंपरा आहे. तर काही लोक सांगतात का, अशी काही परंपरा नाही. त्याच दिवशी हा वाद मिटला गेला होता. त्याचबरोबर मुस्लिम पक्षाकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली होती. मात्र सोशल मीडिया आणि इतर घटकांनी हे प्रकरण उचलून धरले आणि त्र्यंबकेश्वर शहराची बदनामी झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer Mandir) नगर परिषदेत नागरिक आणि मुस्लिम समाजातील प्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यानुसार घटना झाली त्याच दिवशी हा वाद मिटला गेला होता. मुस्लिम पक्षाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. फक्त धूप दाखविण्याचा प्रयत्न होता, मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजारी, संदलचे आयोजक, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष आणि मंदिराचे विश्वस्त उपस्थित आहेत. त्र्यंबकेश्वर शहराची बदनामी होऊ नये, यासाठी पुढाकार घेऊन शांतता आणि धार्मिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी सगळेजण एकत्र आलेले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान सदर प्रकरणानंतर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेले व्हिडिओ, त्याचबरोबर नकारात्मक बातम्यांमुळे वातावरण बिघडत गेलं. मात्र यापुढे असं होणार नाही, याच पार्श्वभूमी ही बैठक आयोजित केली असल्याचे सांगण्यात आले. उरूसचा कार्यक्रम सुरू असताना धूप दाखवण्यासाठी काही लोकांनी मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले आणि मंदिरात जाण्यास मज्जाव केला. यानंतर संबंधित उरूस आयोजकांनी दिलगिरी व्यक्त केली ते म्हणाले की आमच्याकडून जर अनावधानाने काही जर झाले असेल तर आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका उरूस आयोजकांनी मांडल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
दरम्यान सदर उरूस परंपरेबद्दल त्र्यंबकेश्वर शहरामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह असून काही लोक म्हणतात, परंपरा आहे. तर काही लोक सांगतात का, अशी काही परंपरा नाही. परंतु हा वाद न करता दोघांची सामंजस्याची भूमिका आहे, ती मांडली जात आहे. त्यामुळे दोघाही लोकांना आम्ही एकत्रित बसवून यामध्ये मार्ग काढणार असल्याचे पत्रकार परिषदेतील उपस्थितांनी सांगितले. आणि सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर शहरातील वातावरण बिघडले असल्याने अनेकजण बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
लहानपणापासून परंपरा बघत आलोय...
तर बैठकीत उपस्थित असलेले एक जण म्हणाले की, आम्ही लहानपणापासून ही परंपरा बघत आलो आहे. आज ते एक पायरी पुढे गेले, यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना का अडवले नाही. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न झाला नाही, हे ठामपणे सांगतो, असे ते म्हणाले. आम्हीही मस्जिदमध्ये जातो, दर्शन घेतो. त्यांनी कधी अडवलं नाही, मग ते देखील चौकातून धूप दाखवत असतात, मात्र यंदा एक पायरी पुढे जाऊन धूप दाखविण्याचा प्रयत्न झाला, त्या संदर्भात सुरक्षा रक्षकांनी थांबविण्याची आवश्यकता होती, असे ते म्हणाले...एकूणच सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर शहरातील धूप दाखवण्याची परंपरे संदर्भात दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. शहरातील कोणीही नागरिक बोलण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नेमकी परंपरा आहे किंवा नाही हा अद्यापही न सुटलेला प्रश्न असल्याचे चित्र आहे.