Nashik Chhagan Bhujbal : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना कोरोनाची लागण, प्रकृती स्थिर असल्याची माहिती
Nashik Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Nashik Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. काल येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात काल तपासणी केल्यानंतर अहवालातून स्पष्ट झाले आहे.
छगन भुजबळ हे काल नाशिकहून (Nashik) येवला येथे शहीद जवान अजित शेळके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. जवान शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते येवला येथील निवासस्थानी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते येवल्याहून नाशिकमध्ये परतले. थंडी, ताप असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेणार असल्याचे समजते आहे.
येवला (Yeola) तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना नुकतेच देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी काल सकाळी वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. लागलीच त्यांना नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांच्यावर भुजबळ फार्म येथील राहत्या घरीच उपचार सुरू आहेत.
सद्यस्थितीत भुजबळ यांची प्रकृती स्थिर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यावेळी त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तात्काळ त्यांना घरी जाण्यास मुभा देण्यात आली. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितले. सध्या भुजबळ हे नाशिक येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत.
नाशिकमध्ये कोरोना वाढतोय..
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात एच3 एन2 (H3N2) या नवीन विषाणूसह कोरोना वाढू लागला आहे. नव्या विषाणूच्या रुग्णामधून नव्याने कोरोनाबाधित (Corona Update) रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाचे सातत्याने रुग्ण वाढत असताना जोडीला एच3 एन2 या नवीन विषाणूचेही आढळून येत असल्याने केंद्रासह राज्य सरकारने सतर्कतेचे आवाहन केले आहे.