Chhagan Bhujbal Corona Positive : उपमुख्यमंत्री अजित पवारांपाठोपाठ छगन भुजबळांना कोरोनाची लागण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Chhagan Bhujbal Corona Positive : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. ट्विट करत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.
छगन भुजबळ आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 27, 2022
राज्यात राजकीय नेत्यांना कोरोना होण्याची मालिका सुरूच आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोना झाला होता. आता त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पाठोपाठ भुजबळांच्या नावाची भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच आपल्या कामकाजाला सुरुवात करताना बंडखोर आमदारांच्या कुटुबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अँटिजेन पॉझिटिव्ह आली होती त्यांनतर त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती.
संबंधित बातम्या :