एक्स्प्लोर

Mumbai Corona : मुंबईतही वाढता कोरोना! पालिकेने वाढवली रुग्णालयातील बेडची संख्या

BMC Increased in Beds : देशासह राज्यातही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे.

Mumbai Covid19 Update : देशासह राज्यातही कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Covid Positive Patients) आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही (Maharashtra) नंबर आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या दोन रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Mumbai Corona Update : मुंबईतही वाढता कोरोना

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 1,850 आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 30 खाटा आहेत. बीएमसीने म्हटलं आहे की, जेव्हा-जेव्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा आवश्यकतेनुसार रुग्णालयातील बेडची संख्या आणखी वाढविली जाईल. तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तसेच उपकरणे देखील वाढविली जातील. 

दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी संसर्गाला लोक बळी पडत आहेत. पण नागरिकांना याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्या. मास्क वापर, सोशल डिस्टंसिंग पाळा, शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

Mumbai Corona Update : मुंबईत 123 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली. मागील 24 तासांत मुंबई 123 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. मुंबईत 43 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 21 रुग्ण व्हेंटिलटरवर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात रविवारी एकूण 1956 सक्रिय रुग्णांची नोंद झाली. राज्यात शनिवारी 437 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

Mumbai Corona Update : केंद्राची राज्यांसोबत महत्त्वाची बैठक

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज कोविड-19 आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 10 आणि 11 एप्रिल रोजी कोव्हिडसंदर्भात देशव्यापी मॉक ड्रिलचेही नियोजन करण्यात आलं आहे. मॉक ड्रीलच्या प्रोटोकॉलवरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. कशाप्रकारे मॉक ड्रील करायचं यासंदर्भात माहिती देणार आहेत. भारतात दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णसंख्या समोर येत आहे. महाराष्ट्र सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आढळणाऱ्या राज्यापैकी एक आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात आढावा बैठक घेतली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Coronavirus : धोका वाढला! कोरोनापासून बचावासाठी चतुःसूत्री; 'या' चार T चा अवलंब करा, आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget