(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : शरद पवार यांचं माझ्यावर अतोनात प्रेम, म्हणून माझा नंबर पहिला, असं का म्हणाले मंत्री छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी पक्ष उभारणीवेळी शरद पवारांसोबत पहिला नेता मी होतो, अस छगन भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal : शरद पवार (Sharad Pawar) यांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Maharashtra NCP) पक्ष ज्यावेळी निर्माण झाला, त्यावेळी पक्ष उभारणीसाठी मी स्वतः उभा राहिलो होतो. त्यानंतर बाकीचे अनेक दिवसांनी एकत्र आले, कुणी निवडणूक लढवून कुणी प्रवेश करून पक्षात आले. मात्र सर्वांचा माझ्यानंतर नंबर लागतो, माझा नंबर पहिलाच असतो अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री छगन भुजबळ हे नाशिकला (Nashik) येत असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. नुकतेच ते इगतपुरीत दाखल झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार गटाबरोबर शपथविधी घेतल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदा नाशिकमध्ये आले असून दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील नाशिकमध्ये असून आज सायंकाळी चार वाजता येवला शहरात त्यांची जाहीर सभा होत आहे. दुसरीकडे भुजबळांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे.
छगन भुजबळ इगतपुरीत (Igatpuri) दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी नाशिककर जनतेचा मनापासून आभारी आहे. मुंबईपासून नाशिक दौऱ्याला सुरवात केल्यानंतर ठाणे, कल्याण, भिवंडी अनेक ठिकाणी कार्यकर्ते, बंधू, भगिनी मोठया प्रमाणावर स्वागतासाठी उपस्थित होते. याचा अर्थ असा आहे की अजितदादा पवार आणि आम्ही घेतलेला निर्णय जनेतला पसंत पडलेला आहे. त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि जनता सुद्धा स्वागताच्या रूपाने उपस्थित आहे. नाशिकला येत असताना अनेक ठिकाणी स्वागत झाले असून ठाणे, कल्याण, भिवंडी, मुलुंड या ठिकाणीही मोठ्या संख्येने समर्थक जमल्याचे भुजबळ म्हणाले.
माझा पहिला नंबर
भुजबळ पुढे म्हणाले की, आत सर्व निर्णय झाला असून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही कामाला लागलो आहोत. ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली, त्या वेळेला नाशिक जिल्ह्यात मोठं काम उभं केलं आहे. या संधीचा उपयोग शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, जनतेसाठी, कामगारांसाठी होईल. आज शरद पवार यांची येवल्यात म्हणजेच मतदारसंघात सभा होत असल्याचे विचारल्यावर भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी निर्माण झाला, त्यावेळी पक्ष उभारणीसाठी मी स्वतः उभा राहिलो होतो. त्यानंतर बाकीचे अनेक दिवसांनी एकत्र आले, त्यामुळे माझा नंबर पहिलाच असतो, असेही ते म्हणाले.
आमदारांचा आकडा महत्वाचा नाही...
माझ्यासोबत आमदारचा आकडा किती हे महत्वाचा नाही. 23 राज्याचे पदाधिकारी आमच्यासोबत असून ते कार्यकारिणी बैठकीत होते. नाशिक जिल्ह्याचा वैशिष्ट्य असा आहे की आमचे विचार पटणारे मतदार आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष राहिले पाहिजे. मात्र विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे, असं भाजप करत आहे. कोणी फेरविचार करायचा असेल तर त्यांनी करावा, असा सल्लाही अजित पवार गटाला उद्देशून दिला आहे. तसेच राजकारणात मी कोणाला शत्रू मानत नाही, विचार वेगळे असतील..तसेच जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. पक्षाची विचारधारेसोबत ते अनेक वर्षे राहिले, त्यामुळे ते अडसर ठरू शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले.