एक्स्प्लोर

Sharad Pawar : 'ना टायर्ड हूँ, ना रिटायर हूँ'! वय झाल्याच्या टीकेला अटलजींच्या वाक्यातून शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : 'ना टायर हूँ, ना रिटायर हूँ' अशा शायराना अंदाजात वय झाल्याच्या टीकेला शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Sharad Pawar Nashik : 'मी आजही धडधाकट असून आजही पक्ष सांभाळण्यास सक्षम आहे. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला (Maharashtra NCP)  जनमानसात नेणार असल्याचे सांगत 'ना टायर हूँ, ना रिटायर हूँ' अशा शायराना अंदाजात वय झाल्याच्या टीकेला शरद पवार (Sharad Pawar)  यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्यातून शरद पवार यांनी टीकेला उत्तर दिले आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज नाशिक (Nashik) जिल्ह्यात असून येवला येथील सभेसाठी  (Yeola) ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वयाबाबत टीका करणाऱ्या लोकांना ठणकावलं आहे. ते म्हणाले की , आजही माझी तब्येत सक्षम असून पक्ष पुढे चालविण्यासाठी जोमाने काम करत राहणार आहे. जोपर्यंत आपल्यावर प्रेम करणारी माणसे जवळपास आहेत, तोपर्यंत हा पक्ष पुढे नेण्यांसाठी काम करत राहणार आहे. 'ना टायर हू, ना रिटायर हू' असं अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला देत त्यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

शरद पवार पुढे म्हणाले की, आज नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा होत असून नाशिक का निवडला याचे कारणही त्यांनी दिले आहे. स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसचा मोठे अधिवेशन येथे झालं. त्यामुळे नाशिकला मोठा इतिहास असल्यानं दौऱ्याची सुरुवात नाशिक येथून झाली आहे. तसेच नाशिककडे येताना लोकांचे चेहरे पाहून माझा आत्मविश्वास वाढला. तसेच छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी येवलामधून निवडणूक लढवावी अस सहकाऱ्यांनी सांगितलं आणि भुजबळ यांनी येवल्यातून निवडणूक लढवली. त्यांनतर नाशिकमध्ये मोठं यश याआधी आम्हाला मिळालं आहे. 

तसेच महाराष्ट्रमध्ये काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली, त्यात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. मला वैयक्तिक कुणावरही टीका करायची नाही. मात्र राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा पराभव होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांना दहा वर्ष मंत्रिपद दिल, लोकसभेत पराभव होऊनही पटेलांना राज्यसभेत पाठवलं, मात्र मनाविरुद्ध गोष्ट झाली. अनेकदा लोक म्हणायचे सुप्रिया सुळेवर तुम्ही अन्याय केला, सुप्रिया सुळे यांनी पक्षीय राजकारणात यावा, असा आग्रह कार्यकर्त्यानी केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी त्या निवडून आल्याचे शरद पवार म्हणाले. 

आमदारांचा आकडा महत्वाचा नाही... 

माझ्यासोबत आमदारचा आकडा किती हे महत्वाचा नाही. 23 राज्याचे पदाधिकारी आमच्यासोबत असून ते कार्यकारिणी बैठकीत होते. नाशिक जिल्ह्याचा वैशिष्ट्य असा आहे की आमचे विचार पटणारे मतदार आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष राहिले पाहिजे. मात्र विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे, असं भाजप करत आहे. कोणी फेरविचार करायचा असेल तर त्यांनी करावा, असा सल्लाही अजित पवार गटाला उद्देशून दिला आहे. तसेच राजकारणात मी कोणाला शत्रू मानत नाही, विचार वेगळे असतील..तसेच जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. पक्षाची विचारधारेसोबत ते अनेक वर्षे राहिले, त्यामुळे ते अडसर ठरू शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले. 

Sharad Pawar : छगन भुजबळ 1999 पासून शरद पवारांसोबत? आज अचानक साथ सोडली, शरद पवारांकडून आज हल्लाबोल? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget