एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sharad Pawar : छगन भुजबळ 1999 पासून शरद पवारांसोबत? आज अचानक साथ सोडली, शरद पवारांकडून आज हल्लाबोल? 

Sharad Pawar : शरद पवारांनी (Sharad Pawar) भुजबळांचाच मतदारसंघ का निवडला यावरून खमंग चर्चा सध्या सुरू आहेत. 

Pawar Vs Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (Maharashtra NCP) मधील फुटी नंतर शरद पवारांचे झंझावाती दौरे सुरू झालेत. पहिली सभा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या बालेकिल्लात होत आहे.. ज्यांनी ज्यांनी पवारांची साथ सोडली, त्यांच्या मतदारसंघात जाऊन शरद पवार नेत्यांना आव्हान देत मतदारांना आवाहन करणार आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) भुजबळांचाच मतदारसंघ का निवडला यावरून खमंग चर्चा सध्या सुरू आहेत. 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या राजकीय प्रवासाची दिशा बदलल्याने आठ दिवसांपूर्वी एकाच सत्कार समारंभात सहभागी होणारे हे दोन नेते एकाच मार्गावरून नाशिकला येत असले तरी दोघांच्या घड्याळातील  वेळ वेगळी होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरीकडे पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसची मुलूख मैदानी तोफ छगन भुजबळ. दोघेही शक्ति प्रदर्शन करत आज नाशकात दाखल झाले.. मंडल आयोगाच्या मुद्यावरून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे, सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्द्यामुळे शरद पवारसोबत काँगेसचा हात सोडून पवारांची साथ देणारे आणि आता पवारांचीही साथ सोडून अजित दादांच्या गटात सहभागी होणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या राजकीय प्रवासातील हे दुसरे राजकीय बंड आहे.

1999 शरद पवार यांच्या जवळ असणारे प्रदेशाध्यक्ष पद , गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असे महत्वाचे पद उपभोगणारे, अडीच वर्षे तुरूंगाची हवा खाल्ल्यानंतर ही शरद पवारांनी भुजबळ यांना मंत्रीपद दिले, तरीही भुजबळ यांनी ओबीसीचा मुद्दा पुढे करून पवारांची साथ सोडल्याने त्यांच्याच मतदारसंघात जाऊन भुजबळांना अस्मान दाखविण्याची रणनीती पवार गटाकडून आखण्यात आली आहे. भुजबळ वक्ते आहेत, सभा गाजविण्याचे कसब त्यांच्यात आहे.  सलग चार टर्म पासून येवल्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने अजित दादांना भक्कम साथ देण्याऱ्या नेत्यालाच हादरा दिल्याने इतरांपर्यंतही पवारांच्या आक्रमकतेचा संदेश पोहचविण्याची त्याच्यावर हल्लाबोल करण्याची चाल पवारांनी खेळली आहे. 

शरद पवारांची नाशिकला साद 

शरद पवार यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केले आहे, पुलोद पासून नाशिक जिल्हा पवारांच्या सोबत उभा राहिला आहे. त्यामुळे नव्या इनिंगची सुरवात करण्यासाठी त्यांनी बारामती, म्हाडा नव्हे तर नाशिकला पसंती दिली असून नाशिककरांना साद घातली आहे. पवारांच्याच मुशीत तयार झालेल्या रोहित पवारांनीही अजित पवार गटात सहभागी झालेल्यावर हल्ला करत पवार गटाचे इरादे स्पष्ट केलेत. ठाकरे गटानेही भुजबळांच्या विरोधात दंड थोपटले असून पवारांच्या सभेला रसद पुरवत पाठबळ दिले आहे. 

नाशिकचे बाहुबली आपणच ... 

एकीकडे पवारांचा झंझावात सुरू झाला असताना, दुसरीकडे पवारांच्या दौऱ्याचे महत्व कमी करण्यासाठी आणि नाशिकचे बाहुबली आपणच आहोत. हे दाखवून देण्यासाठी छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे येण्याचा आजचाच मुहूर्त शोधला. पवार साहेबांचे आपल्यावर प्रेम असल्याने ते येवल्यात सभा घेत आल्याची खोचक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. छगन भुजबळ राज्यातील वरिष्ठ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत.   भुजबळ जेव्हा जेव्हा अडचणीत येतात, नवा मार्ग निवडतात किंवा संघर्षाला उतरतात. तेव्हा तेव्हा ओबीसींची मोठी ताकद त्यांच्या सोबत उभी राहते. आजही नाशिकच्या रस्त्यावर तेच दृश्य होते. त्यामुळे आजची गर्दी आणि दोन्ही गटाचे शक्ती प्रदर्शन मतात परावर्तित होते का? हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल, तोपर्यंत हल्ले, प्रतिहल्ले, आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच राहणार आहे. 

 

Sharad Pawar Nashik : शरद पवार नाशिकमध्ये दाखल, आज पहिल्यांदा छगन भुजबळांविना स्वागत, कशी आहे सभेची तयारी? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 Pm

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Embed widget