Nashik Advay Hire : अद्वय हिरेंची अडचण वाढली! नाशिक जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
Nashik News : मालेगाव (Maleagon) येथील उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर काही दिवसांत अद्वय हिरे यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Advay Hire : नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Udhhav Thackeray) गटात दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे उपनेते पद मिळालेले अद्वय हिरे (Advay Hire) यांच्या कुटुंबियांसह 32 जणांविरोधात फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल झाल्याने नाशिकच्या मालेगावात खळबळ उडाली आहे.
रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी आयेशा नगर पोलीस स्थानकात नाशिक (Nashik) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव (Maleagaon) शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीमध्ये शिक्षकाची नोकरी लावून देण्याच्या फसवणूक केल्या प्रकरणावरुन मालेगाव कॅम्प पोलीस स्थानकात सटाणा (Satana) येथील राजेंद्र गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मालेगाव शहरात दोन आणि सटाणा पोलिसात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या दिवशीच 'महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती' संचालकांविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, अद्वय हिरे यांचा शिवसेना प्रवेश तसेच उध्दव ठाकरे यांनी दणदणीत सभा व त्यानंतर या प्रकरणांना वाचा फुटून दाखल झालेले दोन्ही गुन्हे यामुळे राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.
आठ वर्ष जुनी केस
संबंधित केस आठ वर्षे जुनी असून तसेच सहकार कोर्टात वर्ग त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. अशाप्रकारे पुन्हा गुन्हा नोंदवणे हे बेकायदेशीर असून दामागे फक्त आकस आणि सूड भावना स्पष्ट दिसून येत आहे. शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खोट्या गोष्टीमध्ये वयाचे उद्योग सुरू असून गलिच्छ राजकारण आणि पराभवाची भीती त्यांना स्पष्ट दिसत आहे. याबाबत सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेची 31 कोटींची फसवणूक
मालेगाव शहरातील द्याने शिवारात यंत्रमाग प्रकल्प सुरू करावयाचा असल्याचे भासवून बनावट दस्तऐवज तयार करत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 31 कोटी 40 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यावरून रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसह 29 जणांविरोधात रमजानपुरा पोलिसांत ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत कर्ज मंजुरीकरता प्रकरण सादर करावयाचे व त्यास तारण म्हणून स्थावर मिळकती देण्याचे आमिष दाखवले. यानंतर बँकेकडून 7 कोटी 46 अशी कर्ज रक्कम उचलली. कर्जाची व्याजासह 5 आनेवारी 2013 पासून आजपर्यंत परतफेड न करता बँकेचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष
दरम्यान मालेगाव येथील संस्थेसह 32 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरीकडे मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यासह सटाणा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती येथे शिक्षकांची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चार विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत दिसून येत आहे. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील फिर्यादीकडून दहा लाख रुपये, सटाणा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील फिर्यादींकडून अनुक्रमे 12 लाख 25 हजार, दुसऱ्या फिर्यादीकडून 12 लाख 25 हजार, तिसऱ्या फिर्यादीकडून 15 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
