Santosh Deshmukh Case: कृष्णा आंधळे सायको गुन्हेगार, वाल्मिक कराडची पिल्लावळ नसल्याने परळीत संध्याकाळी शुकशुकाट असतो: सुरेश धस
Suresh Dhas in Nashik: अंजली दमानिया त्यांच्या पातळीवर बोलत आहेत, मला त्याबाबत माहिती नाही. करुणा शर्मा यांचे आरोप खरे असावते, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

नाशिक: वाल्मिक कराड आणि त्याच्या पिल्लावळीमुळे परळीतील जवळपास 500 व्यापारी शहर सोडून निघून गेले होते. या सगळ्या व्यापाऱ्यांनी गुंडगिरीमुळे आपले घरदार सोडले होते. आकाची गुंडगिरी इतकी होती की, ते लोकांची घरं पाडून तिकडे स्वत:ची मालकी प्रस्थापित करायचे. मात्र, आता वाल्मिक कराड (Walmik Karad) याला अटक झाल्यानंतर परळीतील (Parli News) जनतेने आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता संध्याकाळी परळीत दादागिरी चालत नाही. इतकी वर्षे येथील व्यापारी आणि जनता गुंडांच्या दबावाखाली राहत होती, असे वक्तव्य आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केले. ते रविवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबाबत भाष्य केले. अंजली दमानिया किंवा करुणा शर्मा काय म्हणाल्या यापेक्षा धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरुन दूर व्हावे, अशी मागणी त्यांच्याच पक्षातील आमदार करत आहेत. अनेक संघटनांचीही तीच मागणी आहे. मी अद्याप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. पोलिसांकडून संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. एसआयटी आता आकापर्यंत पोहोचली आहे. कारवाई त्यापुढे गेल्यावर मी त्याबाबत बोलेन. याप्रकरणात धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे सुरेश धस यांनी म्हटले.
कृष्णा आंधळे सायको किलर, पोलीस भरतीसाठी तयारी करताना गुन्हेगार झाला: सुरेश धस
संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप मारेकरी कृष्णा आंधळे फरार आहे. याबाबत सुरेश धस यांनी म्हटले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने सुरु आहे. फक्त कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या कामगिरीवरील कलंक आहे. कृष्णा आंधळे हा छत्रपती संभाजीनगरला पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, तो गुन्हेगारीकडे वळला. तो सायको झाला होता. त्याला आई-वडील किंवा कुटुंबाशी देणंघेणं नव्हतं. तो अनेक गुन्ह्यात फरार होता. आतादेखील तो राज्याबाहेर लपून बसला असेल. तो काही नामचीन गुंड नाही. तो कोकरु बाळ आहे, कधीतरी तो पकडला जाईल. कुठेही गेला तरी तो सापडेल. आमचा पोलीस आणि गृहविभागावर पूर्ण विश्वास आहे, असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख यांचे मारेकरी फाशीवर जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील: सुरेश धस
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही, याचा निर्णय अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातातआहे. त्यांनी मनात आणलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी होत आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख प्रकरणात सर्व गोष्टी केल्या आहेत. त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये दिले, एसआयटी स्थापन केली आणि आरोपींना मकोका लावला, असे सांगत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजितदादांच्या कोर्टात ढकलला.
विष्णू चाटेने मोबाईल गंगापूर धरणात फेकून दिला; सुरेश धस यांची माहिती
आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्याबाबतही भाष्य केले. विष्णू चाटे देशमुखांच्या हत्येनंतर नाशिकमध्ये आला. त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि गंगापूरच्या धरणात फेकून दिला. त्यानंतर विष्णू चाटे पोलिसांना शरण गेला होता. विष्णू चाटेने मोबाईल फेकून दिल्यामुळे तपासा अडथळा येण्याची शक्यता नाही. कंपनीला सांगून विष्णू चाटेच्या मोबाईलमधील सगळा डेटा रिकव्हर करता येईल, असे सुरेश धस यांनी म्हटले.
आणखी वाचा
संतोष देशमुख प्रकरणात केज पोलीसांना सहआरोपी का केलं नाही? खासदार बजरंग साेनवणेंचा सवाल, म्हणाले..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
