Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, भाजपच्या गळाला लागलेल्या राजन साळवींना खेचून आणलं
Eknath Shinde: कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

Eknath Shinde: एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करतेय आणि असं असताना आता शिवेसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Group) जोरदार इन्कमिंग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला (UBT Shivsena) मोठा धक्का बसणार आहे. आठवडाभरात जवळपास तीन माजी आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जातील, अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये राजन साळवी, सुभाष बने आमि गणपत कदम यांचा समावेश आहे.
माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी पक्षप्रवेश होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बनेही मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहेत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असेल.
एकनाथ शिंदेंचा भाजपलाही धक्का-
माजी आमदार गणपत कदमही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गणपत कदम हे राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंची भाजपच्या मनसुब्यांना खिळ घातल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातील कोकणामधील तीन आमदार शिंदेंच्या शिवसेनेते जाणार असल्याचे हा भाजपाला देखील मोठा धक्का असेल. कारण रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी भाजप प्रयत्न करतेय. त्याचवेळी काही माजी आमदारांना देखील भाजपने संपर्क केला होता, राजन साळवी हे त्यापैकीच एक होते. पण एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सर्व मनसुब्यांना खिळ घातला आहे.
'राजन साळवींचा सहज पक्षप्रवेश कठीण'
कोकणात उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांच्या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे. राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे. मात्र राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नाही, असं मोठं विधान किरण सामंतांनी केलं आहे. तर आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे राजन साळवींना प्रवेश देतील असं सामंत म्हणालेत. त्यामुळे पक्षप्रलेशाच्या चर्चेतच साळवींच्या नावाला विरोध सुरु असल्याचं एका अर्थानं दिसून येतंय.
रत्नागिरीत ठाकरेंना धक्का, VIDEO:
आणखी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

